अमावस्या नंतर सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी? अमावस्या फवारणी माहिती…
व्हायरल फार्मिंग : अमावस्या आणि सोयाबीन पिकातील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, उंट अळी आणि तंबाखू वरील अळी यांचा खूप मोठा सबंध आहे. अमावस्येचा काळोख्या रात्री अळीचे या अळीचे पतंग अंडी घालतात आणि अमावस्या नंतर 4 ते 5 दिवसात सोयाबीन पिकात अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. त्यामुळे अमावस्या नंतर चार ते पाच दिवसाच्या आत सोयाबीन दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे. अमावस्या नंतर सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी? संपूर्ण माहिती पाहू.
शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती व हवामान विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
जुलै महिन्यात अनेक दिवसापासून ढगाळ वातावरण आणि पाऊस पडत असून सोयाबीन पिकाची पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही. तसेच ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सोयाबीन पिकात अळ्यांचा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा शेतात खोड कीड आणि पांढरी माशी देखील वाढलेली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात बुरशी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अमावस्या नंतर सोयाबीन पिकात दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे.
या वर्षी अतिरेक पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन पिकाची मर्यादेपेक्षा जास्त वाढ झाली असून वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल पाहू, तसेच अळी आणि कीड नियंत्रण करण्यासाठी काय उपाय करता येईल पाहू.
• अमावस्या सोयाबीन दुसरी फवारणी:-
तुमच्या सोयाबीन पिकात तुम्ही दुसरी फवारणी केली नसेल तर अमावस्या नंतर ही फवारणी करून घ्या अन्यथा सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
अळी नाशक :- Evicent 3 ग्रॅम किंव्हा Emamectine Benzoate 12 ग्रॅम किंव्हा Ampligo 10 मिली प्रती पंप वरील पैकी कोणतेही एक अळी नाशक घ्यावे.
सोयाबीन वाढ जास्त झाली असेल आणि फुल 30 टक्के पेक्षा जास्त लागले असेल तर टॉनिक वापरणे टाळावे त्याजागी 00-52-34 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
किंव्हा
सोयाबीन फुल अवस्थेत आहे पण वाढ नाही तर तुम्ही Tata Bahaar 40 मिली त्याच बरोबर 00-52-34 100 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून वातावरण अत्यंत खराब आहे त्यामुळे दुसऱ्या फवारणी मध्ये एक चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या फवारणी मध्ये घ्यावे.
•अमावस्या सोयाबीन दुसरी फवारणी:-
अळी नाशक:- Evicent 3 ग्रॅम किंव्हा Emamectine 12 ग्रॅम किंव्हा Amoligo 10 मिली कोणतेही एक 20 लिटर पंप साठी वरील प्रमाणे घ्यावे.
+
सोयाबीन वाढ खूप जास्त असेल व फुल भरपूर लागले असेल तर शक्यतो टॉनिक वापरू नका त्याजागी 00-52-34 100 ग्रॅम प्रति पंप फुल अवस्थेत घेतले तरी चालेल. 00-52-34 मध्ये 00 टक्के नत्र आहे त्यामुळे वाढ होणार नाही.
+
पण तुमच्या सोयाबीन मध्ये फुल लागली तसेच वाढ काम आहे अश्या शेतकऱ्यांनी Tata Bahaar 40 मिली किंव्हा Isabion 40 मिली प्रती पंप घ्यावे. किंव्हा ज्या कंपनीचे स्वस्त अमिनो ऍसिड घटक असलेले टॉनिक मिळेल ते तुम्ही घेऊ शकता.
+
अनेक दिवसापासून वातावरण अत्यंत खराब झाले आहे, ढगाळ आन पावसाचे वातावरण आहे त्यामुळे सोयाबीन पिकात बुरशी वाढली आहे त्यामुळे एक बुरशीनाशक या फवारणी मध्ये घेतल्यास फायदा मिळेल.