अलर्ट आज या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट इशारा

Havaman andaj today:- आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी मराठवाडा व मध्ये महाराष्ट्रात येलो अलर्ट या भागातील काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी विजांचा पाऊस व गारपीट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

दिनांक 29 फेब्रुवारी नवीन हवामान अंदाज
आज दिनांक 29 फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर जिल्ह्यातील काही भागात तुरळक ठिकाणी विजांचा पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज..

दिनांक 29 फेब्रुवारी आजचा हवामन अंदाज. (Today havaman andaj). Havaman andaj today…..

शेतकरी मित्रांनो 26 फेब्रुवारी पासून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील विदर्भात बऱ्याच ठिकाणी विजांचा प्रचंड गडगडाट व गारपीट पाहायला मिळाली आहे. तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व जोरदार गारपीट झाल्यामुळे पिकांना तडाखा बसला आहे.

या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तसेच जोरदार गारपीटीमुळे राज्यातील कापूस, तूर, हरभरा, गहू, द्राक्ष, मका, कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रात्री पावसाचे वातावरण व दुपारी वाढलेला उन्हाचा तडाखा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार करत आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यात वादळी पाऊस व गारपीट जोरदार झाली आहे.

आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मध्ये महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात जोरदार गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.
आज कोकणातही तुरळक ठिकाणी विजांचा पाऊस व गारपीट होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील बदलत्या वातावरणामुळे वाढत असलेले तापमान पावसासाठी पोषक वातावरण तयार करत आहे. किमान व कमाल तापमान वाढत असल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मागील 24 तासात कमाल तापमान वाढत आहे.

परभणी जिल्ह्यात कमाल तापमान जवळपास 35 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस वर पोहचले आहे.

राज्यात कमाल तापमान वाढले असून गर्मी वाढलेली जाणवत आहे कारण राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस वर पोहचले आहे धन्यवाद….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *