अलर्ट:- राज्यातील उन्हाचा पारा वाढणार पंजाबराव डख

05 मार्च 2024 पंजाबराव डख हवामान अंदाज:- शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील आठवडाभर राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस तसेच अवकाळी गारपीट झाली आहे.

राज्यातील उन्हाचा पारा वाढणार पंजाबराव डख
05 मार्च 2024 पंजाबराव डख हवामान अंदाज:- शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील आठवडाभर राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस तसेच अवकाळी गारपीट झाली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 02 मार्च पर्यंत राज्यातील वातावरण ढगाळ होते. आज दिनांक 05 मार्च 2024 पासूनचा नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे. काय म्हणतात पंजाबराव डख, मार्च महिन्यात पाऊस आहे का, 05 मार्च पासून कसे असेल राज्यातील वातावरण, गारपीट इशारा आहे आहे पाहा सविस्तर माहिती.

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे कारण 05 मार्च पासून राज्यातील वातावरण कोरडे होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.

संपूर्ण मार्च महिना कोरडा जाणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे म्हणजे दिनांक 05 मार्च पासून 27 मार्च पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिला आहे.

March heat wave:- मार्च महिन्यात तापमानाचा/उन्हाचा पारा वाढणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, तूर काढून घ्यावे असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

राज्यातील दिनांक 05 ते 10 मार्च दरम्यान रात्री थंडी तर दिवसा जोरदार उन तापणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, जनावरे गोठ्यात थंड ठिकाणी बांधावे तसेच घरातील लहान बाळ व वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी.

एल निनोचा प्रभाव जुने पर्यंत कायम:-

प्रशांत महासागरातील पुष्ट भागावर तापमान कायम वाढण्याची शक्यता आहे कारण एल निनोचा प्रभाव जुने पर्यंत राहण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे त्यामुळे राज्यात उन्हाचा/तापमानाचा पारा चढणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

दिनांक 11 मार्च पासून दिवसा आणि रात्री गर्मी वाढणार आहे म्हणजे दिवसा कडक ऊन तर रात्री अधिक गर्मी जाणवणार आहे. संपूर्ण मार्च महिन्यात हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाबराव पाटील डख यांनी वर्तवली आहे. दिनांक 05 मार्च पासून तर 27 ते 28 मार्च पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे तसेच तापमानाचा पारा अधिक प्रमाणात वाढणार आहे.

दिनांक 05 मार्च पासून तर 28 मार्च पर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये धन्यवाद…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *