डॉ रामचंद्र साबळे; दिनांक/ 22 ते 24 जुलै कसा असेल पाऊस? संपूर्ण जिल्ह्याचा हवामान अंदाज…
• दिनांक/ 22 ते 24 जुलै नवीन हवामान अंदाज:-
आज पासून संपूर्ण आठवड्यावर राज्यातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते हलका पाऊस पडणार आहे, तसेच काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज डॉ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. या आठवड्यात कसा असेल पाऊस? दिनांक/ 22 ते 24 जुलै पावसाचा अंदाज कसा? कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार? संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत..
शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतीविषयक आणि हवामान विषयक संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपण देत असतो, त्यामुळे आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
• सूर्यदर्शन कधी होणार? पीक पिवळी पडत आहे..
डॉ रामचंद्र साबळे सांगतायत की जुलै चा शेवटचा आठवडा दरवर्षीच अधिक प्रमाणात पावसाचा असतो, अनेक ठिकाणी या वर्षी जुलै मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे जुलैचा शेवटचा आठवडा संपूर्ण ढगाळ वातावरण राहणार असून सूर्यदर्शन होण्याची शक्यता कमीच आहे. ढगाळ वातावरणामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास उघड मिळेल तशी फवारणी करावी डॉ रामचंद्र साबळे यांचा शेतकऱ्यांना सल्ला आहे.
• यंदा राज्यातील धरणे भरणार:-
डॉ रामचंद्र साबळे यांनी अशी माहिती दिली आहे की, यंदा जुलै महिन्यात 22 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील लहान हलन तळे आणि धरणे भरतील असा पाऊस होणार आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील संपूर्ण धरणे (Dam) भरणार असल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिले आहे.
• सध्या मालेगाव, लातूर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जरी असेल तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकूण नऊ मोठे पाऊस होतात त्यामुळे राज्याचा या पूर्व भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जोरदार राहणार आहे, रब्बी पीक निघतील, विहिरींना पाणी येईल असा पाऊस राहणार असतो.
• जुलैचा शेवटचा आठवडा हवामान अंदाज:-
जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे दिनांक/ 22 जुलैपासून साधारण जुलै च्या शेवटपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कसे राहणार आहे, त्याबद्दल रामचंद्र साबळे यांनी थोडक्यात माहिती दिली असून ती माहिती आपण पाहणार आहोत.
• राज्यात आजपासून आठवडाभर 1002 हेक्टा पास्कल हवेचा दाब राहणार आहे, तर बंगालच्या उपसागरात 998 हेक्टा पास्कल इतका हवेचा दाब रणार असल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून वारे पूर्व कडून उत्तरेस वाहतील तसेच पश्चिमेकडून उत्तरेस वाहतील. अरबी समुद्रातून वाहणारे वारे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश वरून वाहतील.
तसेच आज दिनांक/ 22 जुलै ते 30 जुलै या आठवड्यात जोरदार पाऊस राहणार आहे. ढगाळ वातावरण राहून कोकणात मुसळधार पाऊस राहणार आहे, तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पाऊस राहणार असल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
• ला निना सक्रिय होण्यास सुरुवात:-
डॉ रामचंद्र साबळे सांगतायत की प्रशांत महासागराचे तापमान कमी झाले असून 15 ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत आहे, त्यामुळे ला निणा सक्रिय होऊन राज्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. यापुढे देखील पावसासाठी पोषक वातावरण राहून राज्यात चांगला पाऊस पडणार आहे तसेच राज्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज आहे.
• धुळे, नाशिक, नंदुरबार, धाराशिव, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात वादळी वारे राहण्याची शक्यता डॉ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली असून वाऱ्याचा वेग प्रती तास 22 ते 28 किलो मीटर राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
• पूर्ण आठवडा जिल्हा हवामान अंदाज:-
नागपूर जिल्ह्यात आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाचा अंदाज डॉ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..