आज रात्री रत्नागिरी आणि सातारा अतिवृष्टी! तर उदया 24 जुलै या जिल्ह्यात तुफान पाऊस?
• 23 जुलै रात्रीचा हवामान अंदाज:-
आज रात्री कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून एक दोन भागात अतिवृष्टी होऊ शकते. नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात आज रात्री मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावरील भागात अती मुसळधार पावसाचा इशारा असून तुरळक भागात अतिवृष्टी होऊ शकते. तसेच पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस होणार आहे. काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रात्री घाट परिसरात अती मुसळधार ते एक दोन भागात अतिवृष्टी होऊ शकते.
तसेच चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरली जिल्ह्यात ही आज रात्री येलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची नोंद होईल तर काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील. तसेच पश्चिम विदर्भात विजेच्या कडकडाटासह जोरदार तर मध्यम पावसाचा अंदाज आज रात्री आहे.
नंदुरबार आणि धुळे घाट परिसरात आज रात्री मुसळधार पावसाचा अंदाज असून सपाट परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम हलका पाऊस होणार आहे. तर मराठवाड्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस सुरू राहील.
• 24 जुलै हवामान अंदाज:-
उदया दिनांक/ 24 जुलै राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस? कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट? कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट? आणि कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट? घेऊ संपूर्ण माहिती..
• उदया दिनांक/ 24 जुलै रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी असून घाट परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होणार असून तुराल ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, तसेच सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट असून सातारा घाट परिसरात मुसळधार ते अती मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. सातारा जिल्ह्यातील सपाट परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
• आज रात्री पासून नाशिक घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार असून उदया आणखी पावसाचा जोर नाशिक जिल्ह्यातील घट परिसरात वाढू शकतो तसेच आज रात्री नाशिक घाट परिसरात मुसळधार ते एक दोन भागात अतिवृष्टी होऊ शकते.
• जोरदार ते अती जोरदार पावसाचा अंदाज:-
उदया दिनांक/ 24 जुलै मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार ते अती जोरदार पावसाचा अंदाज उदया आहे. तसेच खानदेशात उदया पावसाचा जोर वाढणार असून नंदुरबार, धुळे आणि घाट परिसरात मुसळधार मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहून हलका आणि मध्यम पाऊस होऊ शकतो तर अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे धन्यवाद..