आज 24 जुलै दुपार नंतर आणि रात्री या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस!
व्हायरल फार्मिंग : नमस्कार सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक/ 24 जुलै सकाळचे 11 वाजले असून राज्यातील पुढील 24 तास हवामान अंदाज कसा आहे पाहू.
काल भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलेला असून वाहतूक बंद पडली आहे. तसेच आजही राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्याच बद्दल या लेखात माहिती घेऊ.
• सतत धार पडणारे ढग:-
आज दिनांक/ 24 जुलै सध्या विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात सतत धार पावसाचे ढग दाटून आलेले असून या भागात सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तसेच नगर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील सतत धार पावसाचे ढग दाटून आले असून या भागात देखील मध्यम व जोरदार पाऊस पडत राहील.
• मुसळधार पावसाचे ढग:-
नाशिक, पुणे, नंदुरबार, ठाणे, पालघर घाट परिसरात (Ghat Area) मुसळधार पावसाचे ढग दाटून आले असून, या भागात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होऊ शकतो, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही घाट परिसरात (Ghat Area) जोरदार ढग दाटून आले असून या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
• आज दिनांक/ 24 जुलै सकाळी 8 वाजेपासून तर उदया 8 वाजे पर्यंत कसा असेल पाऊस?
घाट माथ्यावरील (Ghat Area) भागात पुढील 24 तास मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नंदुरबार, पुणे, ठाणे आणि पालघर घाट माथ्यावरील परिसरात ढगांची गर्दी वाढली असून पुढील 24 तास मुसळधार (Heavy Rain) ते अती मुसळधार (Extremely Heavy Rain) पावसाची शक्यता आहे.
तसेच मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाटाकडील भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात (Ghat Area) एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याच बरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात मध्यम (Moderate Rain) ते काही ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस पाहायला मिळणार आहे.
तसेच नाशिक, धुळे, नगर, उत्तरेकडील भागात मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी सतत धार पावसाची शक्यता आहे.
• विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे धन्यवाद…