आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे? Online Adhar Link to Bank Account in Mobile.
How to Link Adhar Card Bank Account :- नमस्कार मित्रांनो, आज आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे? त्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करू शकता. अत्यंत सोपी पद्धत आहे, त्यासाठी तुम्हाला ही माहिती शेवटपर्यंत वाचायची आहे. तरच तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे त्याविषयी सर्व माहिती मिळेल.
शेतकरी मित्रांनो तसेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीतच आहे, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी डीबीटी (DBT) चा वापर केला जातो. त्यामुळे अनुदानाचे, पीक विम्याचे किंव्हा लाडकी बहिण योजनेचा सन्मान निधी (हप्ता) बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक (Bank Aadhar Seeding) असावे लागते.
तसेच सर्वप्रथम आपले आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे, चेक करने गरजेचे आहे. तरच तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे की नाही ते समजेल.
• सर्व प्रथम आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक म्हणजे ॲक्टिव (Active) आहे की नाही कसे चेक करावे?
त्यासाठी तुम्हाला तुमच्या गूगल (Google) वर जाऊन माय आधार (My Aadhar) असे सर्च करायचे आहे. त्यांनतर My Aadhar Login या संकेतस्थळावर वर क्लिक करा व त्यांनतर Login हे ऑप्शन निवडा. त्यांनतर तुमचा आधार नंबर टाकून घ्या व कॅपच्या (Captcha) इंटर करा. त्यांनतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल वर OTP येईल तो टाकून लॉगिन करून घ्या. त्यांनतर Bank Seeding Status या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, की नाही चेक करा. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, तर Active दाखवले जाईल. तसेच कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे त्या बँकेचे नाव दाखवले जाईल. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी Active असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची गरज नाही. पण Inctive दाखवत असेल तर तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.
• आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे?
मित्रांनो जर तुमचे Adhaar Bank Seeding Status Inactive × असेल तर तुम्हाला ते Active ✓ करण्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी लिंक करणे आहे. मोबाईल मध्ये अगदी काही मिनिटातच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे, त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहू.
आधार बँक खात्याशी लिंक करण्यासाठी गूगल वर जाऊन NPCI सर्च करा. त्यांनतर NPCI वेबसाईट ओपन करा. त्यांनतर होम स्क्रीन वर येऊन Consumer यावर क्लिक करा. त्यानंतर Bharat Aadhar Seeding Enable यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर मागितला जाईल तो टाकून घ्या व नंतर Seeding हे ऑप्शन निवडा. त्यांनतर तुम्हाला जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करायची आहे ती बँक निवडा त्यासाठी Select Bank यावर क्लिक करून बँक निवडा. त्यांनतर तुम्ही पहिल्यांदाच आधार बँक खात्याशी लिंक करत असाल तर Fresh Seeding यावर क्लिक करा. त्यांनतर तुम्हाला जी बँक लिंक करायची आहे त्या बँकेचा अकाऊंट नंबर टाकायचा आहे. दोन वेळा अकाऊंट नंबर मागितला जाईल तो टाकून कन्फर्म करून घ्या. व नंतर काही Terms and Conditions आहेत त्या वाचून घ्या व बॉक्स वर क्लिक करा. त्यांनतर Captcha भरून घ्या व Procced या ऑप्शन वर क्लिक करा. त्यांनतर तुम्हाला Terms and Conditions सविस्तर वाचून घ्यायचा आहे व Agree and Continue यावर क्लिक करून घ्या व त्यांनतर तुम्हाला OTP येईल तो टाका व Sumbit करा धन्यवाद…