आरे वा 17 ऑगस्ट रोजी लाडक्या बहीण योजनेचे 6000 रुपये मिळणार? (Ladki Bahin Pahila Hapta 17 August 2024)..
व्हायरल फार्मिंग : महाराष्ट्र राज्याचे लाडके अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी केलेला वादा लवकरच होणार पूर्ण, कारण राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट एकदाच दोन महिन्याचे 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून जनसंवाद यात्रेत त्यांनी याविषयी भाष्य केले आहे.
नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. माहिती खूप महत्वाची आहे आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
• एका कुटुंबातील महिलांना 6000 रुपये कसे मिळणार पाहा :-
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी एका कुटुंबातील एका रेशन कार्ड वरील 21 ते 65 वय वर्ष गटातील दोन महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. म्हणजे एका कुटुंबातील दोन महिलांनी फॉर्म भरले असेल व त्यांना फॉर्म मंजूर झाल्याचा मॅसेज आला असेल, तर एका कुटुंबातील त्या दोनही महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये म्हणजे एका कुटुंबातील दोन महिलांना मिळणार एकूण 6000 रुपये.
• रक्षाबंधन अगोदरच मिळणार लाभ :-
बहिणींसाठी सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते व लाडका भाऊ सदैव आपल्या बहिणीची रक्षा करेल असा ठाम निर्णय घेतो. त्यातच अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी वादा केला होता की मी राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना कुठल्याही परिस्थितीत इतर पक्षाने कितीही विरोध केला तरी राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देणारच असा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला होता.
तसेच राज्यातील जवळपास सवा कोटी महिला या योजनेसाठी पात्र झाल्या असून, यापुढेही फॉर्म दिनांक/ 31 ऑगस्ट पर्यंत भरणे सुरूच आहे. जवळपास दीड ते दोन कोटी पर्यंत राज्यातील महिला या योजनेसाठी पात्र होऊ शकतात असा अंदाज आहे.
• पहिला हप्ता या तारखेला मिळणार?
लाडकी बहिण योजना राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेली योजना आहे. दिनांक/ 01 जुलै पासून या योजनेसाठी सुरू झालेले फॉर्म करोडो महिलांनी भरले असून एक कोटी पंचवीस लाख महिला या योजनेसाठी पात्र झाल्या आहेत. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट एकदाच दोन महिन्याचे 1500 व 1500 रुपये म्हणजे एकूण 3000 रुपये एका कुटुंबातील एका पात्र महिलेला मिळणार आहे. अश्या एका कुटुंबातील दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 19 ऑगस्टला मिळणार नसून 17 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याची माहिती अजित दादा पवार यांनी दिली आहे.
• रक्षाबंधन पूर्वीच मिळणार लाभ :-
दिनांक/ 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्या अगोदरच दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींनी रक्षाबंधन सणासाठी खरेदी करावी त्यासाठी त्यांना रक्षाबंधन पूर्वीच लाभ मिळणार आहे.