Amavshya Favarni; उदया अमावस्या नंतर कापूस व सोयाबीन फवारणी कोणती करावी | अमावस्या कापूस फवारणी माहिती..
व्हायरल फार्मिंग :- नमस्कार शेतकरी मित्रांनो अमावस्या नंतर कापूस पिकात मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. कारण अमावस्येच्या काळोख्या रात्री मदी पतंग कापूस झाडाच्या पानावर आणि फांद्यावर अंडी घालतात त्यामुळे अमावस्या नंतर कापूस पिकात मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. कापूस पिकात एकूण तीन प्रकारच्या बोंड आळी आढळतात एक गुलाबी बोंड अळी, दुसरी ठिपक्यांची बोंड अळी आणि तिसरी अमेरीकन बोंड अळी अश्या एकूण तीन प्रकारच्या बोंड अळ्या कापूस पिकावर मोठा प्रादुर्भाव करतात.
अमावस्या नंतर कापूस पिकावरील फवारणी व्यवस्थापन आपण पाहणार आहोत, अमावस्या कापूस फवारणी कोणती करावी? अमावस्या फवारणी नियोजन? अमावस्या फवारणी औषध? अमावस्या फवारणी फायदे? अश्या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा.
अमावस्या फवारणी का करावी?
कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर पाते आणि बोंड अवस्थेत अमेरिकन बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, लष्करी अळी, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी व उंट अळी अश्या अनेक अळ्यांचा प्रादुर्भाव अमावस्या नंतर कापूस पिकात वाढतो त्यामुळे पाते आणि बोंड अवस्थेत या अळ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतात आणि उत्पादनात घट पाहायला मिळते. वरील सर्व अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अमावस्या नंतर कापूस पिकात फवारणी करावी लागते.
अमावस्या नंतरच अळीचा प्रादुर्भाव का वाढतो?
शेतकरी मित्रांनो अमावस्या नंतर कापूस पिकात अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो हे ऐकल्यानंतर तुम्हाला अंधश्रद्धा वाटेल, परंतु अमावस्येच्या काळोख्या रात्री मादी पतंग जास्तीत जास्त अंडी घालतात आणि कापूस पिकात अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो हे तेवढीच सत्य आहे. त्यामुळे ही अंधश्रद्धा नसून यामागे वैज्ञानिक कारण आहे.
अंडी नाशक फवारणी का करावी?
अमावस्येच्या काळोख्या रात्री बोंड आळी मोठ्या प्रमाणात अंडी घालतात, त्यामुळे या अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी जर आपण अंडी नाशकांचा वापर केला तर आपण कापूस बोंड अळी नियंत्रणात ठेऊ शकतो आणि कापूस उत्पादनात होणारी घट कमी करू शकतो. त्यामुळे अमावस्या नंतर कापूस फवारणीसाठी अंडी नाशक फवारणी महत्वाची आहे हे सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे. तरच आपण 100 टक्के अळी नियंत्रण करू शकतो.
कापूस अमावस्या फवारणी औषध कोणते वापरावे?
अमावस्या नंतर चार दिवसाच्या आत फवारणी करणे गरजेचे आहे कारण अंडी घातल्या पासून तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर येते, त्यामुळे सर्वात बेस्ट अंडी नाशक कापूस फवारणीसाठी प्रोफेनोफॉस हे आहे. त्यासाठी तुम्हाला प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC याचा वापर तुम्ही प्रती लिटर पाण्यात 2 मिली या प्रमाणे करू शकता. कारण प्रोफेनोफॉस हे सर्वात चांगले अंडी नाशक म्हणून काम करते तर सायपरमेथ्रीन हे अळी आणि रस शोषण कीड नियंत्रण करते. कमी खर्चात अळी आणि रस शोषण कीड नियंत्रण होणार आहे.
लाईट ट्रॅप चा वापर करून देखील तुम्ही बोंड अळीचे व्यवस्थापन करू शकता, शेतामध्ये लाईट ट्रॅप तुम्हाला उभारायचा आहे म्हणजे बोंड अळीचे पतंग लाईटकडे आकर्षित होतील आणि त्या ठिकाणी अळीचे व्यवस्थापन आपल्याला करता येईल त्यामुळे लाईट ट्रॅप देखील बोंड अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत कमी खर्चामध्ये एक चांगला उपाय आहे.
अमावस्या फवारणी फायदे ?
1- अमावस्या नंतर चार दिवसाच्या आत फवारणी केल्यामुळे बोंड अळीचे 100 टक्के नियंत्रण होते.
2- अवामस्या फवारणी म्हणजे कमी खर्चात बोंड अळी नियंत्रण करणे होय.
3- लाईट ट्रॅप वापर करून खूप कमी खर्चात अळी नियंत्रण करता येते.
4- उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते धन्यवाद..