उन्हाळी कलिंगड लागवड- (Watermelon farming):-
राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी हंगामातील प्रमुख पीक कलिंगड (Watermelon) या पिकाची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
कलिंगड उर्फ टरबूज या फळांना उन्हाळी हंगामात खूप मागणी असते तर जानेवारी व फेब्रुवारी या कालावधीत या पिकाची लागवड करून तुम्ही फक्त 65 ते 70 दिवसात लाखाचे उत्पन्न घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो जर कलिंगड या पिकाला बाजार भाव चांगला मिळाला तर हमकास हे पीक तुम्हाला मालामाल करणार आहे. त्यामुळे आज आपण कलिंगड लागवडीपासून तर काढणी पर्यंत सविस्तर व अचूक माहिती घेणार आहोत.
कलिंगड या पिकाविषयी अचूक माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो आज आपण अनुभवी कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची माहिती या पोस्ट द्वारे दिली आहे.
कलिंगड लागवड करण्यासाठी पूर्वमशागत खूपच महत्वाची आहे. पूर्वमशागत करण्यासाठी एक 25 से.मी. खोल नांगरणी करावी व त्यानंतर रोटा मारून जमीन भुसभुशीत करून घ्यावी व नंतर 5 किंव्हा 6 फुटावर बेड मारून घ्यावे व नंतर बेडवर बेसल डोस देण्यासाठी DAP 1 बॅग, दाणेदार 3 बॅग , पोटॅश 25 किलो व 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास उत्पादन वाढीसाठी मदत होते. बेसल डोस दिल्या नंतर बेडवर आच्छादन (25 Micron Mulching) पेपर अंथरूण घ्यावा.
कलिंगड लागवडीसाठी बेडवर आच्छादन केल्यास होणारे फायदे तणांची वाढ थांबते, जमिनीत वलावा टिकून राहते, बेसल डोस चा 100 टक्के फायदा होतो व उत्पादनात मोठी वाढ होते.
कलिंगड लागवडीसाठी वान –
कलिंगड लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगाला कमी बळी पडणाऱ्या वाणाची निवड करावी म्हणजे सागर किंग, मेलोडी, शुगर क्वीन, बाहुबली व मॅक्स या वाणाची निवड करावी.
कलिंगड लागवड करण्यासाठी रोप हे 20 ते 25 दिवसाचे आसवे. रोप हे बेडवर लागवड करण्यासाठी अधिक कालावधीचे, रोगग्रस्त, पिवळे पडलेले नसावे तर रोप हिरवीगार, रोगमुक्त व कवळी पाने असलेली असावी.
कलिंगड हे पीक वेलवर्गीय असून जमिनीवर पसरते त्यामुळे या पिकाची लागवड 6×2 फुटावर करावी. लागवडीचे अंतर योग्य ठेवल्यास फळ पोसण्यासाठी शेतात हवा खेळती राहते, अन्नद्रव्य पुरवठा चांगला होतो आणि उत्पादनात मोठी वाढ आपल्याला दिसून येते. कलिंगड लागवडीसाठी 6×1.5 किंव्हा 6×2 फूट अंतर ठेवल्यास साधारण एकरी 25 ते 30 टन उत्पादन मिळू शकते.
शेतकरी मित्रांनो कलिंगड या पिकाची लागवड दोन पद्धतीने करता येते पहिली पद्धत म्हणजे टोकण पद्धतीने बी टोकन करणे आणि दुसरी पद्धत म्हणजे रोपांची पुनर्लागवड करणे.
कलिंगड लागवड करण्यासाठी बी टोकन करणे या पद्धतीमध्ये उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता आहे तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव या पद्धतीने लागवड केल्यास वाढण्याची शक्यता आहे.
रोपांची पुनर्लागवड केल्यास मर रोग कमी लागतो, झाडांची संख्या आपण पाहिजे तेवढी ठेऊ शकतो परंतु रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी रोप हे निरोगी, हिरवेगार निवडावे.
शेतकरी मित्रांनो कलिंगड रोपांची पुनर्लागवड करण्याअगोदर त्या रोपावर रोप प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी 1 लिटर पाणी घेऊन त्यात 3 ग्राम कार्बेन्डाझिम बुरशीनाशक टाकून द्रावण तयार करावे व पुनर्लागवड करण्याअगोदर ते रोप द्रावणात बुडवून लागवड करावे.
कलिंगड पिकाच्या अवस्थेत नुसार विद्राव्य खतांचा वापर करावा त्यासाठी कलिंगड रोप वाढीची अवस्था आहे त्यासाठी 19-19-19 हे विद्राव्य खत ठिबक द्वारे किंव्हा फवारणी द्वारे वापरावे. कलिंगड फुटवे अवस्थेत 12-61-00 हे विद्राव्य खत ठिबक किंव्हा फवारणी द्वारे वापरावे. फुल अवस्थेत 00-52-34 व बोरॉन हे विद्राव्य खते फवारणी मध्ये वापरावे तर फळ अवस्थेत फळ पोसण्यासाठी 13-00-45 किंव्हा 00-00-50 हे विद्राव्य खत ठिबक किंव्हा फवारणी द्वारे वापरावे.
तर शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी कलिंगड लागवडी बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे धन्यवाद…