उन्हाळी तीळ लागवड माहिती 2024 (Unhali til lagvad):-
शेतकरी मित्रांनो राम राम आज आपण उन्हाळ्यातील महत्वाचं तेल वर्गीय पीक म्हणजे तील (Sesamum) या पकाची लागवडी पासून तर काढणी पर्यंत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तीळ हे महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत महत्वाचे तेल वर्गीय पीक आहे. या पिकाची लागवड करून तुम्ही कमी कालावधीत चांगले उत्पादन घेऊ शकता. या पिकाला भाव चांगला मिळतो साधारण आता 14 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल दराने तीळ विक्री होत आहे. मकर संक्रांती ला तीळ या तेल बियाण्यांचे खूपच महत्त्व आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आस म्हणत तीळ मकर संक्रांतीला खाल्ला जातो.
तीळ या पिकाची पेरणी करण्यासाठी 26 ते 28 अंश सेल्सिअस तापमान अत्यंत महत्वाचे आहे या तापमानात तीळ जोमदार येतो. तीळ या पिकासाठी हवामान स्वच्छ कोरडे सूर्यप्रकाश असलेलं मानवते. तसेच उन्हाळ्यात पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण या पिकास नुकसानकारक ठरते.
तीळ लागवडीसाठी जमीन भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी असावी, चोपण्युक्त किंव्हा पाणी साचून राहणाऱ्या जमिनीवर तीळ या पिकाची लागवड शक्यतो टाळावे. हलकी, मध्येम भारी किंव्हा भारी जिमिन पिकासाठी योग्य आहे. तीळ लागवडीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर असावे.
तीळ पिकासाठी पेरणी अगोदर एकरी 10 बैल गाड्या शेतात शेन खत टाकावे त्यात 2 कीलो ट्रायकोडर्मा (Trichoderma) मिक्स करून द्यावे. ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशीनाशक आहे या जैविक बुरशीनाशक चा वापर केल्यास तुमच्या तीळ पिकात मर रोग कमी लागतो.
पेरणी कशी करावी:-
शेतकरी मित्रांनो तीळ पिकाचे बियाणे खूप नाजूक आणि बारीक असल्यामुळे तीळ पिकाची पेरणी करणे कठीण होते त्यासाठी तुम्हाला एक टोपले चांगले कुजलेले शेणखत किंव्हा बारीक शेतातील माती घ्यायचे आहे त्यात तुम्हाला 1.5 किलो तीळ मिक्स करून तिफनीच्या मदतीने पेरणी करायची आहे, आस केल्यास पेरणी एक सारखी व एक समान होते.
उन्हाळ्यात तिळाची पेरणी कधी करावी:-
मित्रांनो अधिक प्रमाणात थंडी असल्यास तीळ पेरणी शक्य तो टाळावी. तीळ पिकाची पेरणी करण्यासाठी 15 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान केल्यास अधिक उत्पादन मिळते.
तीळ पेरणी करण्यासाठी पूर्वमशागत माहिती :-
शेतकरी मित्रांनो तीळ या तेल वर्गीय पिकाचे बियाणे खूपच आकाराने लहान असतात त्यामुळे या पिकाची पेरणी करण्यासाठी तुमची जमीन भुसभुशीत करून घ्यावी. तुमची जमीन भुसभुशीत असेल तर तिळाची उगवण क्षमता वाढते. शेत तयार करण्यासाठी एक खोल नांगरणी करून घ्यावी त्यांनतर रोटावेटर मारून ती जमीन भुसभुशीत करावी. रोटावेटर केल्यानंतर आडव्या व उभ्या पाळ्या मारून घ्या व एकरी साधारण 8 ते 10 बैल गाड्या शेतात शेन खत टाकावे. तीळ उत्पादन वाढीसाठी जमिनीची योग्य मशागत खूपच गरजेची आहे ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी पूर्वमशागत करावी.
तिळाची पेरणी जमिनीत 3 सें. मी. पेक्षा खोल करू नये. तीळ बियाणे बारीक असल्यामुळे जास्त खोल पेरणी केल्यास उगवनिसाठी अडथळा निर्माण होतो. तसेच पेरणी अगोदर हलके पाणी देऊन घ्यावे व वाफसा झाल्यानंतर पेरणी करावी म्हणजे उगवण क्षमता वाढेल.
तिळाची पेरणी कशी करावी :-
तिळाची पेरणी तुमची तिफनीच्या मदतीने किंव्हा खुरपी हातात घेऊन काकर पाडून हाताने पेरणी करू शकता पण ही पेरणी जमिनीत 3 से. मी. पेक्षा जास्त खोल होणार नाही याची काळजी मजुरांनी घेतली पाहिजे.
तीळ पेरणी साठी अंतर किती किती असावे:-
तीळ पिकाची पेरणी जर तुम्ही हलक्या जमिनीत करत असाल तर अंतर हे 30×10 से.मी. ठेवणे योग्य आहे पण जर तुमची जमीन मध्येम भारी किंव्हा भारी असेल तर पेरणी अंतर हे 45×10 से.मी. ठेवणे आवश्यक आहे. पेरणी अंतर कमी ठेवल्यास तीळ दाट होऊन उत्पादनात मोठी घट होते.
तीळ पिकाचे खाडे भरणे व विरळणी करणे म्हणजे काय:-
शेतकरी मित्रांनो तीळ पेरणी केल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांनी जर तुमचा तीळ पातळ झाला असेल तर पडलेले खाडे भरून घ्यावे जर तुमचा तीळ दाट झाला असेल तर रोप उपटून विरळणी करावी.
तीळ पेरणी अगोदर बीज प्रक्रिया:-
तीळ पेरणी अगोदर एक किलो बियाण्यास 3 ग्राम थायरम किंव्हा 5 ग्राम ट्रायकोडर्मा चोळून पेरणी केल्यास तीळ पिकातील मर रोग कमी होतो.
तीळ खत व्यवस्थापन:-
तीळ पिकासाठी खत व्यवस्थापन करत अस्ताने पेरणी बरोबर एकरी 1 बॅग D.A.P किंव्हा 12-32-16 त्याच बरोबर 10 किलो गंधक दिल्यास तीळ उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून येते. तीळ पिकासाठी खताचा दुसरा डोस साधारण पेरणी नंतर एक महिन्याने 25 किलो युरिया दिल्यास तीळ पिकाची वाढ जोमदार होते.
तीळ पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती ची माहिती:-
उन्हाळी हंगामासाठी AKT-101 हा तिळाचा वान अधिक उत्पादन देणाऱ्या वणापैकी एक उत्कृष्ट वान आहे तसेच PKV NT-11 हा सुद्धा एक उन्हाळी तिळाचा अधिक उत्पादन देणाऱ्या वानापैकी एक शिफारस केलेला वान आहे.
तीळ पिकासाठी पाणी व्यवस्थापन:-
तीळ पिकासाठी पाणी व्यवस्थापन हे टप्यात करणे गरजेचे आहे पेरणी अगोदर जमीन चांगली वलून घ्यावी व त्यांनतर वाफसा झाल्यावर पेरणी करावी. तीळ पेरणी नंतर शक्यतो पाणी देऊ नये परंतु तीळ उगवण झाल्यानंतर 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी व्यवस्थापन करावे.
तीळ पिकातील किड:-
तीळ पिकात काही रस सोषण किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींचा समावेश आहे तसेच बोंड्या पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी आळी दिसून येते.
तीळ पिकातील रोग:-
तीळ पिकात पेरणी नंतर सुरुवातीला मर रोहलगाचा प्रादुर्भाव दिसून येतो या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणी अगोदर बीज प्रक्रिया नक्की करावी. तसेच खोड किज व मुळ कुज हा रोग दिसून येतो. तीळ पिकातील करपा व भुरी हे सुध्दा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी हंगामासाठी तीळ लागवडी बद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल धन्यवाद.