Limbu market latest update:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. राज्यातील मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट आली असून जोरदार उन्हाचा पारा चढला आहे त्यामुळे आंबट वर्गीय फळांमध्ये लिंबू या फळाला कसे दर मिळाले सविस्तर माहिती घेऊ.
विदर्भातील अकोला व बुलढाणा या दोन जिल्ह्यांमध्ये तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून या जिल्ह्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे, तसेच राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढलेला आहे त्यामुळे लिंबू या फळवर्गीय पिकाला सध्या मागणी वाढली आहे, तसेच या फळ पिकाची आवक कमी असून याला दरही चांगला मिळत आहे.
लिंबू या फळांचे महत्व उन्हाळ्यात खूप जास्त आहे, कारण या फळात व्हिटॅमिन सी (Ascorbic Acid) चे प्रमाण अधिक असल्यामुळे वाढत्या तापमानात या आंबट वर्गीय फळाचे शरबत करून पेल्यास प्रतिकारशक्ती वाढते.
श्रीरामपूर:-
शेतमाल – लिंबू (Lemon)
या बाजार समिती मध्ये लिंबू फळाची एकूण आवक 08 (क्विंटल) आहे, तर लिंबू बाजार भाव या ठिकाणी कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 10000 रुपये व सर्वसाधारण दर 8000 रुपये प्रति क्विंटल असा भाव बघायला मिळत आहे.
नाशिक:-
शेतमाल – लिंबू (Lemon)
वान – हायब्रीड (Hybrid)
नाशिक या बाजार समिती मध्ये लिंबू फळांची एकूण आवक 24 (क्विंटल) झाली असून, त्यास कमीत कमी दर 8000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 9500 रुपये तसेच सर्वसाधारण दर 9000 रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे.
सोलापूर:-
शेतमाल – लिंबू (Lemon)
वान – लोकल (Local)
सोलापूर बाजार समिती मध्ये लोकल लिंबाची आवक एकूण 17 (क्विंटल) झाली असून त्यास कमीत कमी दर 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 10000 रुपये व सर्वसाधारण दर 6500 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
भुसावळ:-
शेतमाल – लिंबू (Lemon)
वान – लोकल (Local)
भुसावळ बाजार समिती मध्ये लोकल लिंबू वाणाची एकूण आवक फक्त 12 (क्विंटल) झाली आहे, तर त्यास कमीत कमी दर 6000 रुपये तसेच जास्तीत जास्त दर 8000 रुपये व सर्वसाधारण दर 7500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
पुणे मोशी:-
शेतमाल – लिंबू (Lemon)
वान – लोकल (Local)
पुणे मोशी या बाजार समिती मध्ये लोकल लिंबाची एकूण आवक फक्त 25 (क्विंटल) एवढी झाली असून, त्यास कमीत कमी व जास्तीत जास्त दर हा 10000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
राहता:-
शेतमाल – लिंबू (Lemon)
राहता बाजार समिती मध्ये लिंबू फळांची एकूण आवक फक्त आणि फक्त 01 (क्विंटल) झाली असून, त्यास 5000 रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक भाव मिळाला आहे धन्यवाद…