ऑगस्ट मध्ये पावसाचा खंड नाही! पंजाब डख हवामान अंदाज

पावसाचा मोठा खंड नाही! ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार? पंजाब डख..

पंजाबराव पाटील डख हवामान अंदाज
पावसाचा मोठा खंड नाही! ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार? पंजाब डख..

व्हायरल फार्मिंग :- पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि कोकण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, कालपासून चांगला पाऊस वाढला आहे. आज दिनांक/ 4 ऑगस्ट ते दिनांक/ 8 ऑगस्ट पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवला आहे.

पुणे, नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात आजपासून पुढील चार दिवस चांगला पावसाचा जोर वाढणार असून दिनांक/ 8 ऑगस्टपर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे अशी माहिती डक यांनी दिली आहे.

आज दिनांक/ 4 ऑगस्ट पासून 10 ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे. आज या भागात तर उद्या त्या भागात अशा स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे.

• खंड पडणार का?

पंजाबराव डख म्हणतात ऑगस्ट महिन्यात खंड पडणार नाही कारण पाऊस सुरूच राहणार आहे. वेगवेगळ्या विभागात पडत राहणार आहे. पावसाचा खंड वगेरे नाही अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. खंड म्हणजे 20 ते 25 दिवस पाऊसच नाही परंतु हा पाऊस भाग बदलत पडत राहणार आहे खंड पडणार नाही.

एकदम पाऊस 20 ते 25 दिवस निघून जाणार नाही तर भाग बदलत दररोज आज या भागात तर उद्या त्या भागात पडत राहणार आहे. त्यामुळे खंड पडणार नाही हे राज्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शेती नियोजन करावे असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.

•जायकवाडी धरण :-

नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडला की जायकवाडी धरणात पाणी साठा वाढतो परंतु आजूनही नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडलेला नाही परंतु ऑगस्ट महिन्यात 50% पर्यंत जायकवाडी धरण भरणार असल्याची माहिती. जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वात महत्वाचे धरण असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना या धरणामुळे मोठा फायदा होतो. परंतु ऑगस्ट पर्यंत हे धरण फक्त दहा टक्के भरले असून ऑगस्ट महिन्यात 50 टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जायकवाडी धरण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 100 टक्के भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

•पिकाची काळजी :-

अनेक दिवसापासून काही भागात जोरदार पाऊस पडत असून सोयाबीन व कापुस पीक पाण्यात बुडाले आहे त्यामुळे जसी वेळ मिळेल तसे शेतातील पाणी बाहेर काढावे तसेच फवारणी आणि खत व्यवस्थापन करून घ्यावे असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *