बँकेतील कर्ज काढतांना तुम्ही जमीनदार होत असाल तर सावधान तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला बसू शकतो फटका!
शेतकरी मित्रांनो तुम्ही कर्ज घेणाऱ्या वेक्तीचे जमीनदार होत असाल तर सावधान कर्ज परतफेड न केल्यास जामीनदारावरही कारवाई होणार.
कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्यास हमी घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअर होणार खराब त्यामुळे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्ज न फेडल्यास जामीनदाराला भविष्यात कर्ज घेतांनी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणताही व्यक्ती कर्ज काढत असेल त्याचा जामीनदर होत असतांनी अनेक वेळा विचार करा आणि जामीनदर होयच का नाही याचा निर्णय घ्या.
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्ज न फेडल्यास बँक जामीनदारालाच सर्वाधिक जबाबदार ग्रहीत धरतात. RBI बँक च्या नियमानुसार कर्जदाराने कर्ज न फेडल्यास जामीनदारदेखील कर्जदाराएवढाच जबाबदार असतो. त्यामुळे कर्जदाराणे कर्ज न फेडल्यास जामीनदारकडून वसूल केले जाते. कर्जाची रक्कम जामीनदाराच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये लायबिलिटी म्हणून दिसते यामुळे जामीनदाराचाही सिबील स्कोअर खराब होतो. त्याला भविष्यात बँक कर्ज काढण्यासाठी अनेक समस्या येतात.
जामीनदार होत आस्तांनी काय काळजी घ्यावी –
1- बँक कडून कर्ज घेणारे कर्जदार तुमचे मित्र किंव्हा नातेवाईक असेल तर जामीनदार होण्याअगोदर त्यांचा व्यवहार कसा आहे तो चेक करावा.
2- कर्जदारांनी या अगोदर कुणाचे कर्ज बुडवले आहे का याची खात्री करून घ्यावी.
3- कर्जदार इन्कम टॅक्स भरतो का याची देखील खात्री करून घ्यावी.
4- परस्पर मित्र किंव्हा अनोळखी व्यक्ती असेल तर अश्या व्यक्तीचे जामीनदार होऊ नये.
सिबिल स्कोअर कसा असावा:-
तुमचा सिबिल स्कोअर सरासरी 550 ते 650 असणे गरजेचे आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर 700 च्या वर असेल चांगला स्कोअर आहे त्यामुळे तुम्हाला कुढलीही बँक कर्ज देण्यासाठी अडथळा निर्माण करत नाही व तुमचा सिबिल स्कोअर 800 ते 850 तर तुमचा व्यवहार अतिउत्तम मानला जातो कुढली बँक कर्ज देऊ शकते.
सिबिल स्कोअर सर्वात कमी:-
कर्ज काढण्यासाठी बँक नेहमी अर्जदाराचा सिबिल स्कोअर चेक करतात जर त्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर 300 ते 550 असा असेल तर कुधलीही बँक या व्यक्तीला कर्ज पुरवठा करीत नाही.