कापूस भाव कधी व किती वाढणार?
Cotton market news:- कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो कापूस हे पीक राज्यातील एक अत्यंत महत्वाचे नगदी पीक आहे. कापूस या पिकाची लागवड सर्वाधिक विदर्भ, मराठवाडा व खानदेशात केली जाते. फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात कापसाचे दर हे 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल कमी झाले असून सध्या कापसाला 6000 ते 6900 रुपये प्रति क्विंटल असा नीचांकी दर मिळत आहे.
2022 खरीप हंगामातील कापूस लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली होती. या वर्षी कापसाचे दर 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळाल्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा दिसून आला होता.
त्याच हेतून 2023 मध्ये कापसाला 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. परंतु 2023 खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाचा पडलेला खंड नुकसान कारक ठरला आहे.
नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे देशात प्रक्रिया उद्योगासाठी उत्कृष्ट दर्जेचा कापूस उपलब्ध होत नाही. तसेच आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापसाचे भाव दबावात आहे.
सध्या कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून कापसाला 6000 ते 6900 रुपये असा दर मिळत आहे. हा दर बघता देशातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
कापसाला हमी भाव 7020 रुपये प्रति क्विंटल असला तरी सध्या कापूस हा हमी भावापेक्षा साधारण 300 ते 400 रुपये कमी दराने विक्री होत आहे. त्यामुळे कापसाची हमी भाव वाढवावा अशी देशातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
कापूस भाव किती वाढतील?
नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस मोठ्या प्रमाणात भिजला होता त्यामुळे कापसाची प्रत घसरल्यामुळे कापसाचे भाव दबाव खाली असल्याची माहिती कापूस तज्ञांनी दिली आहे.
तसेच कापसाची साधारण रोज 2 लाख गाठींची आवक होत असल्यामुळे कापसाचे भाव सध्या दबावात आहे. हीच आवक कमी झाल्यास कापसाचे भाव मार्च महिन्यात काही प्रमाणात वाढण्याचे संकेत कापूस तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे वाढले आहे. सध्या कापसाला 55 हजार रुपये प्रति युनिट दर मिळत असून हे दर मार्च पर्यंत 58 ते 60 हजार युनिट पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मार्च मध्ये कापसाचे बाजार भाव साधारण 7500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहण्याची शक्यता कापूस तज्ञांनी केली आहे.
प्रक्रिया उद्योगासाठी उत्कृष्ट क्वालिटी चा कापूस मिळत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाची मागणी वाढू शकते त्यामुळे मार्च महिन्यात कापूस भाव काहीसे सुधारतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद…