कापुस पिकात लागतील 100 पाती 50 बोंड हमखास एकरी भरघोस उत्पादन..
शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे एकरी भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर कापूस पिकात होणारी पाते गळ कमी करणे गरजेचे आहे. अनेक वेळा एका झाडाला 100 पेक्षाही अधिक पाते लागतात, परंतु ढगाळ वातावरण किंव्हा किडींचा प्रादुर्भाव होतो आणि मोठ्या प्रमाणात पाते गळ पाहायला मिळते. त्यासाठी कापूस पाते गळ कमी करणे गरजेचे आहे. कापूस पाते गळ कमी करण्यासाठी काय उपाय आहे? कोणत्या औषधींचा वापर केला पाहिजे? कापूस पाते गळ फवारणी कधी करावी? संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.
• शेतकरी मित्रांनो आमची जमीन हलकी असून 3×1.5 फूट या अंतरावर आम्ही गेल्या वर्षी कापूस लागवड केली होती, कापूस पीक जास्त वाढणार नाही परंतु फळ फांद्या जास्त प्रमाणात लागण्यासाठी 60 दिवसला 1 मिली प्रती पंप या प्रमाणे लीहोसिन pgr ची फवारणी घेतली, त्यामुळे कापूस पिकाची वाढ नियंत्रणात राहून फुटवा चांगला लागला आणि एकरी 13 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले.
• कापूस पाते गळ उपाय:-
शेतकरी मित्रांनो कापूस पिकात ढगाळ वातावरणामुळे किंव्हा हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाते गळ पाहायला मिळते, पाते गळ कमी करण्यासाठी फावरणीतून कोणत्या औषधींचा वापर केला पाहिजे थोडक्यात पाहू.
• कापूस पाते गळ फवारणी:-
Planifix – 4 मिली प्रती पंप घ्यावे व त्याच बरोबर पाण्यात विरघळणारे Boron (बोरॉन) 20 ग्रॅम प्रति पंप घ्यावे. कापूस पिकाच्या पाते अवस्थेत बोरॉन आणि Planofix फवारणी केल्यामुळे पाते गळ कमी होते.
• कापूस पिकाची 3×1.5 फूट अंतरावर लागवड केल्यास उत्पादन किती मिळणार?
शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची 3×1.5 फूट अंतरावर लागवड केल्यास एकरी जवळपास 8720 झाडे बसतात, एका झाडाला 40 बोंड जारी लागली तरी तुम्हाला एकरी 3 लाख 48 हजार 800 बोंडाची संख्या मिळते आणि एका बोंडाचे वजन 4 ग्रॅम जरी भरले तरी तुम्हाला जवळपास 13 क्विंटल कापूस उत्पादन होणार आहे धन्यवाद..
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा…