कापूस जोमदार वाढीसाठी कोणती फवारणी करावी

कापुस जोमदार वाढीसाठी महत्वाची फवारणी कोणती करावी?

कापूस जोमदार वाढीसाठी कोणती फवारणी करावी
कापुस जोमदार वाढीसाठी महत्वाची फवारणी कोणती करावी?

शेतकरी मित्रांनो काही भागात सुरुवातीपासून पाऊस चांगला आहे, तर काही भागात कमी पाऊस आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कापूस पिकाची पाहिजे तशी जोमदार वाढ दिसत नाही. कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी कोणती फवारणी करावी? कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी फवारणी कधी करावी? संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे.

चुकीचे खत व्यवस्थापन, चुकीचे फवारणी व्यवस्थापन, पावसाचे प्रमाण कमी, योग्य तन नियंत्रण न करणे अश्या अनेक गोष्टी कापूस पिकाची जोमदार वाढ न होण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी फवारणी मधून कसे व्यवस्थापन करता येईल सविस्तर पाहू..

•कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी फवारणी:-

कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी 19-19-19 हे विद्राव्य खत प्रति 20 लिटर पंप साठी 100 ग्रॅम घ्यावे. त्याच बरोबर सिवीड Biovita X टॉनिक 40 मिली प्रती पंप किंव्हा Sagarika टॉनिक 40 मिली प्रती पंप घेणे गरजेचे आहे.

या टॉनिक मुळे कापूस पिकाच्या झाडात फवारणी नंतर हरितद्रव्य तयार होण्यास मदत होते व प्रकाश संश्लेषण क्रिया जोमात होऊन कापूस पिकाची वाढ जोमदार होते. त्यामुळे 19-19-19 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंप त्याच बरोबर कुढलही एक सिवीड 40 मिली प्रती पंप फवारणी सोबत घ्यावे.

• 19-19-19 चे फायदे मित्रांनो तुमच्या कापूस पिकाची जोमदार वाढीसाठी नत्र, स्पुरद आणि पालाश हे प्रथम अन्नद्रव्य खूप महत्वाचे आहे, त्यामुळे कापूस जोमदार वाढीसाठी हे विद्राव्य खत घेणे गरजेचे आहे.

• शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडींचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही या सोबत एक चांगल्या दर्जाचे कुढलेही कीटकनाशक घेऊ शकता तसेच बुरशीनाशक ही घेऊ शकता.

• फवारणी रिझल्ट 100 टक्के कधी मिळतो:-

शेतकरी मित्रांनो कापूस जोमदार वाढीसाठी या फवारणीचा 100 टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर खालील गोष्टी फॉलो करा.
1- विद्राव्य खत आणि टॉनिक फवारणी 100 टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर जमिनीत वल असणे गरजेचे आहे.
2- फवारणीसाठी पाणी स्वच्छ वापरणे गरजेचे आहे. खराब आणि गढूळ पाणी वापरू नये.
3- खारे पाने फवारणी साठी शक्यतो वापरू नये.
4- टॉनिक आणि विद्राव्य खते फवारणी शक्यतो सकाळी करावी भर उन्हात फवारणी टाळावी.
5- कंपनीने जो डोस शिफारस केला आहे तो वापरावा कमी किंव्हा जास्त करू नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *