कापूस पिकासाठी विद्राव्य खते कोणते आणि कधी दयावे संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहा…
Water Soluble Fertilizer For Cotton Crop:- कापुस हे पीक अधिक कालावधीचे पीक आहे 170 ते 180 दिवसाचे हे पीक आहे. अधिक कालावधीचे पीक म्हणले की अचूक खत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. कारण कापूस पिकच्या वाढीच्या अवस्थेत कोणत विद्राव्य खत दिले पाहिजे? कापूस फुटवे अवस्थेत कोणते विद्राव्य खत दिले पाहिजे? तसेच कापूस पाते अवस्थेत कोणते विद्राव्य खत दिले पाहिजे? कापूस बोंड पोसण्यासाठी बोंड अवस्थेत कोणते विद्राव्य खत दिले पाहिजे? संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो मी MSc अग्री झालो असून शेतीविषयक अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी माहिती शेवटपर्यंत वाचा आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा व आपला व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.
• विद्राव्य खताची क्वालिटी चेक कशी करावी?
विद्राव्य खत म्हणजे पाण्यात विरघळणारे खत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनी चे विद्राव्य खत कापूस फवारणी किंव्हा अलवणीसाठी वापरू शकता परंतु विद्राव्य मनल की पाण्यात विरघळणारे जे खत 100 % पाण्यात टाकताच विरघळते ते खत उत्कृष्ट दर्जाचे मानले जाते. त्यामुळे 100 % पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करा.
• विद्राव्य खते कोणती?
19-19-19-, 12-61-00, 00-52-34, 00-00-50 हे प्रमुख विद्राव्य खते आहे. 19-19-19 या विद्राव्य खतामध्ये नत्र, स्पुरद आणि पालाश सम प्रमाणात आहे. 12-61-00 या विद्राव्य खतामध्ये नत्र 12 टक्के तर स्पुरद 61 टक्के आहे. 00-52-34 विद्राव्य खतामध्ये नत्र नसून पिकाची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी या खताचा वापर प्रामुख्याने केला जातो या खतात 52 टक्के स्पुरद तर 34 टक्के पालाश आहे. 00-00-50 या विद्राव्य खतात नत्र आणि स्पुरद नसल्यामुळे या विद्राव्य खताचा वापर पिकाच्या शेवटच्या अवस्थेत केला जातो कारण फळ पोसण्यासाठी किंव्हा फळांना क्वालिटी येण्यासाठी 00-00-50 खताचा वापर केला जातो.
• कापूस पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते विद्राव्य खत दयावे?
•वाढीची अवस्था:- कापूस पीक लागवडीपासून 25 दिवसापर्यंत वाढीची अवस्था असते, त्यामुळे कापूस 25 दिवसाला झाला की कापूस पिकासाठी अळवणीसाठी 4 किलो 19-19-19 एकरी खत ठिबक द्वारे सोडावे किंव्हा 100 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणे फवारणी मधून वापरावे.
• फुटवा अवस्था:- कापूस पिकात 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात फुटवे लागण्यासाठी सुरुवात होते, त्यामुळे कापूस पिकाच्या या अवस्थेत 12-61-00 हे विद्राव्य खत एकरी 4 किलो ठिबक द्वारे सोडावे किंव्हा 100 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणे फवारणी करावी.
• पाते अवस्था:- कापूस पिकात 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाते सुरू होतात, त्यामुळे 65 ते 70 दिवसांनी 00-52-34 हे विद्राव्य खत 4 किलो प्रति एकर ठिबक केले असेल तर ठिबकणे सोडावे किंव्हा 100 ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
• बोंड अवस्था:- कापूस पिकात मोठ्या प्रमाणात बोंड अवस्था 80 ते 85 दिवसाला सुरू होते, त्यामुळे या अवस्थेत कापूस पिकास 00-00-50 विद्राव्य खत 4 किलो प्रति एकर ठिबक द्वारे सोडावे किंव्हा 100 ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
• विद्राव्य खत वापरण्याचे फायदे काय?
1- पिकाला वेळेवर नत्र, स्पुरद व पालाश या सारख्या प्रथम अन्नद्रव्याचा पुरवठा होतो.
2- पिकाची जोमदार आणि निरोगी वाढ होते.
3- कमी खर्चात कापूस पिकास खत व्यवस्थापन करता येते.
4- पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते व किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
5- कीटकनाशक फवारणी खर्च काही प्रमाणत कमी होतो.
6- विद्राव्य खतांच्या वापरामुळे पिकाच्या उत्पादन मोठी वाढ दिसून येते.
• विद्राव्य खत फवारणी साठी काय दक्षता घ्यावी
1- 100 टक्के पाण्यात विरघळणारे विद्राव्य खत निवडावे.
2- फवारणीसाठी पाणी स्वच्छ वापरणे.
3- खारे आणि गढूळ पाणी विद्राव्य खते फवारणी किंव्हा ठिबक द्वारे सोडवण्यासाठी वापरू नये.
4- आज केलेलं विद्राव्य खतांचे द्रावण उदया वापरू नये.
5- विद्राव्य खतांचे प्रमाण कमी किंव्हा अधिक प्रमाणात घेऊ नये.