Cotton news कापूस भाव कधी वाढतील!
Latest cotton market- शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील पावसाचा खड व उशिरा झालेली पेरणी कापूस उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. कापूस उत्पादन कमी झाले म्हणजे कापसाला यंदाही कायम चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांची अशा होते परंतु या सर्व आशेवर पाणी फिरलेले आहे. कारण हमी भावापेक्षा कमी दर सध्या कापसाला मिळत आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. कापूस भाव कधी व किती वाढतील त्याबद्दल कापूस तज्ञांनी व्यक्त केलेली माहिती सविस्तर बघू.
तर जानेवारी महिन्या नंतर कापसाला मिळू शकतो चांगला दर असा अंदाज कापूस
तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. कारण डिसेंबर 2023 पर्यंत शेतकऱ्यांनी एकूण उत्पादनाच्या 40 टक्के कापूस वेकलेली आहे अशी माहिती समोर येत आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यात एकूण शेतकऱ्यांनी 116 लाख गाठींची विक्री केलेली आहे.
डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कापसाची आवक होऊन एकूण 56 लाख गठींची विक्री झालेली आहे. सांगायला झालं तर देशाच्या एकूण उत्पादनाच्या 40 टक्के कापूस हा डिसेंबर महिन्या पर्यंत विकला आहे.
डिसेंबर पर्यंत आवक जास्त राहिल्यामुळे कापूस भाव हा हमी भावापेक्षा कमी राहिला. व कापूस भाव आजुन कमी होईल का या भीतीने तब्बल 40 ते 45 टक्के कापूस आता पर्यंत विक्री झालेला आहे.
कापूस आवक वाढली की भाव कमी होतो हे सर्वांचं माहिती आहे व कापूस आवक घटली की कापूस भाव वाढतो त्यामुळे जानेवारी महिन्याचा शेवटी नंतर कापूस आवक घटून कापूस भाव वाढण्याची शक्यता कापूस तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. ऑक्टोंबर महिन्याचा तुलनेने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कापूस आवक वाढली त्यामुळे कापूस भाव हे 7,000 पेक्षा कमीच राहिले.
कापूस उद्योजकांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कापूस मिळत राहिल्यामुळे कापूस दर हे दबावतच राहिलेले दिसून आले परंतु जानेवारी महिन्यात कापूस आवक कमी झाली तर कापूस दर मात्र 10 टक्के वाढू शकते असा अंदाज कापूस तज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील 3 महिन्यात एकूण 19 लाख गाठिंची आवक बाजार पेठेत झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे.
तसेच ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या मागील तीन महिन्यात देशातून एकूण 4 लाख गाठी आयात झाल्याची माहिती आहे तर 5 लाख गाठी निर्यात झाल्याची माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया कडून समोर आलेली आहे.
शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर आयातीपेक्षा निर्यात जास्त झालेली आहे.
कापूस आयातीसाठी सरकारने जो 11 टक्के शुल्क ठेवलेला आहे तो कायम आहे. तसेच देशा पेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला जास्त भाव मिळत आहे त्यामुळे कापूस आयात करायचा असेल तर देशातील कापूस भावात वाढ अपेक्षित आहे.
कापूस आयात करण्यासाठी जर कापसाला 10 टक्के जास्त भाव असेल व आयात शुल्क 11 टक्के असेल तर खरच उद्योजकांना कापूस आयात करणे योग्य राहील का असा प्रश्न पडतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचा असेल तर देशातील कापूस दरात 10 टक्के वाढ करणे अपेक्षित आहे.
म्हणजे जानेवारी नंतर देशातील कापूस बाजार भाव आंतरराष्ट्रीय बाजार भावा पेक्षा कमी राहिले तर उद्योजकांना कापूस आयात करणे महागात पडेल. त्यामुळे देशातील कापूस दरात 10 टक्के वाढ तज्ञांना अपेक्षित आहे धन्यवाद…