कापूस भावात तुफान वाढ आज अकोट कापूस भाव 7680 रुपये प्रति क्विंटल

आजचे कापूस बाजार भाव:- आज अकोट, अकोला कापूस बाजार भावात 70 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी अकोट मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7610 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता आज मात्र दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या ठिकाणी 70 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ झाली असून कापसाला 7680 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक भाव मिळाला आहे. कापूस लवकरच 8 हजार रुपये प्रति क्विंटल होण्याचे संकेत दिसून येत आहे.

कापूस बाजार भाव आजचे
आज कापूस भावात वाढ अकोट कापूस भाव 7680 रुपये प्रति क्विंटल मिळाला..

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात जोरदार सुधारणा झाली असून देशातील बाजारात कापूस भाव मात्र हळू गतीने वाढत आहे. आज अकोट, अकोला बाजार समिती मध्ये कापूस दरात जोरदार सुधारणा दिसून आली आहे. लांब धाग्यांचा कापूस आयात शुल्क कमी केल्यानंतर कापूस भाव पुन्हा पडतील अशी चर्चा होत होती परंतु तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस मागणी अधिक होत असल्याने कापूस दरात चांगली वाढ पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात बाजारात कापूस आवक कमी झाल्यास कापूस दरात जोरदार सुधारणा दिसून येण्याचे संकेत कापूस व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पाहा आज राज्यातील काही बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला, फरदड कापसाला व नंबर वन क्वालिटी कापसाला कसे भाव मिळतात…

आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुध्दा कापसाला चांगला भाव मिळाला आहे भिजलेल्या कापसाला 6500 तर नंबर एक क्वालिटी कापसाला 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उमरेड बाजार समिती मध्ये आज फरदड कापसाला 6600 रुपये प्रति क्विंटल तर नंबर वन क्वालिटी कापसाला 7170 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये आज कापूस दर स्थिर असून कापसाला कमीत कमी 7000 रुपये तर सर्वसाधारण दर 7300 रुपये व जास्तीत जास्त दर 7600 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती वरोरा माढेली या ठिकाणी आज कापसाची एकूण आवक 600 क्विंटल झाली असून भिजलेल्या किंव्हा फरदड कापसाला 6400 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6800 रुपये प्रति क्विंटल तसेच एक नंबर क्वालिटी कापसाला 7150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून कापूस दर हे खूपच दबावात दिसून येत होते परंतु पुन्हा एकदा कापूस दराने झेप घेऊन कापूस 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचला आहे. या वर्षी पाऊस कमी पडला असून याचा परिणाम कापूस दरावर दिसून येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची खूप जास्त मागणी वाढली असून देशातील कापूस जागतिक बाजारात निर्यात होणार आहे. त्यामुळे कापूस भाव पुढील काळात वाढण्याची दात शक्यता आहे. परंतु जवळपास अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकल्या नंतर कापूस भाव वाढले आहे त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे धन्यवाद….

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *