कापूस भाव हमी भावापेक्षा तब्बल 500 रुपये कमी

कापूस भाव हमी भावापेक्षा तब्बल 500 रुपये कमी;

कापूस बाजार भाव
कापूस भाव तब्बल 500 ते 600 रुपये हमी भावापेक्षा कमी

Cotton news update 2024:- शेतकरी मित्रांनो जानेवारी 2024 मध्ये कापूस बाजार भाव हमी भावापेक्षा (MSP) 500 ते 600 रुपये ने घसरला आहे, देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. पांढर सोन म्हणून वळखल्या जाणाऱ्या कापसाचे यंदा उत्पादन घातल्यामुळे सोन्यासारखे भाव देईल अशी शेतकऱ्यांची अशा होती परंतु या शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फिरलेले आहे, कारण कापूस भाव दररोजच्या दररोज कमी झालेले बघायला मिळत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगाम 2021-22 उत्कृष्ट ठरले या हंगामात कापसाला तब्बल 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता व यानंतरही कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमानात कापूस लागवड केली परंतु त्यानंतर कापूस बाजार भावात प्रत्येक वर्षी नीचांकी बघायला मिळाली आहे.

2023 हंगामात पावसाने खंड दिल्यामुळे कापूस उत्पादन घटले त्यामुळे यंदा कापसाला उच्चांकी दर मिळेल अशी शेतकऱ्यांची अशा होती परंतु उलट मागील 5 महिन्यात कापूस भाव तब्बल 2,000 रुपये ने उतरले आहे. ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.

वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकारने कापसाला 7 हजार 20 रुपये एवढा हमी भाव ठरून दिला आहे, परंतु सध्या हमी भावापेक्षा 500 ते 600 रुपये कमी दराने शेतकऱ्यांना कापूस विक्री करावा लागत आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये कापसाला तब्बल 8,500 रुपये भाव मिळत होता तोच भाव 300 रुपये ने घसरला आणि ऑक्टोंबर मध्ये 8,200 रुपये झाला व नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक कापूस बाजार भावात घसरण बघायला मिळाली 7,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल वर कापूस भाव येऊन पडला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वात जास्त चिंता वाढवणारी बाब म्हणजे जानेवारी 2024 मध्ये हमी भावापेक्षा तब्बल 500 ते 600 रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तसेच कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी यंदा कापूस उत्पादन घटल्यामुळे व तसेच यंदा इलेक्शन असल्यामुळे पुढील काही काळात कापूस भाव वाढतील या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात ऑक्टोंबर महिन्यापासूनच कापूस साठवून ठेवला आहे, परंतु जस जसा हंगाम पुढे सरकला तसाच कापूस भाव मागे आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली.

Today kapus bajar bhav:- दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत मध्ये कापसाला 6,955 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाला आहे तुम्ही खालील पावतीत बघू शकता.

मानवत बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस बाजार भाव दिनांक- 19 जानेवारी 2024 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पॅनिक होऊन सर्व कापूस एकदाच विक्री करू नये टप्या टप्यात शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *