Kapus bajar bhav:- कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटल होणार का? कापूस भाव का वाढू शकतात वाचा सविस्तर माहिती…
शेतकरी मित्रांनो कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटल होणार का हा विषय नंतरचा आहे परंतु लवकरच कापूस 8 हजार रुपये प्रति क्विंटल होणार असल्याची शक्यता कापूस व्यापारी व्यक्त करत आहेत. त्याचे काही प्रमुख कारण आहे ते कारण आपण या लेखात सविस्तर समजून घेऊ. (Kapus bajar bhav mahiti).
शेतकरी मित्रांनो सध्या मागील 4 ते 5 दिवसात कापूस दरात जवळपास 500 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली आहे. मागील आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या ठिकाणी कापूस हा 6900 ते 7000 रुपये प्रति क्विंटल विकला जात होता आता मात्र या बाजार समिती मध्ये कापूस हा सर्वाधिक भाव 7560 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचला आहे, म्हणजे जवळपास 500 रुपये प्रति क्विंटल मागे भाव वाढले आहे. सध्या देशातील कापूस बाजार भाव वला कापूस 6600 रुपये तर चांगला कापूस जास्तीत जास्त 7500 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे. देशातील हा कापूस बाजार भाव जागतिक बाजार समिती पेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे देशातील कापूस जागतिक बाजारात निर्यात झाल्यास कापसाचे बाजार भाव लवकरच वाढतील असा अंदाज कापूस तज्ञ व्यक्त करत आहे.
देशातील कापूस स्वस्त असल्यामुळे निर्यात करण्यासाठी अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे. तसेच मागील चार दिवसापासून कापूस आवक घटली आहे. कापूस आवक मोठ्या प्रमाणात घटल्यास कापसाचे बाजार भाव वाढतील. आंतरराष्ट्रीय बाजारात आपला कापूस स्वस्त असल्यामुळे देशातील कापसाची निर्यात वाढून आपल्या कापसाला चांगला भाव मिळण्याची दात शक्यता आहे.
पुढील महिन्यात देशातील कापसाची निर्यात वाढल्यास कापूस दर हा 8000 रुपये ते 8500 रुपये प्रति क्विंटल होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या जागतिक बाजारात कापूस भाव आपल्या कापसाच्या तुलनेने जास्त असल्यामुळे देशात कापूस आयात कमी व देशातून कापूस निर्यात जास्त झाल्यास कापसाचे भाव वाढणार आहे. कारण जागतिक कापूस आयात करायचा असेल तर 11 टक्के आयात शुल्क ही लागणार आहे. म्हणजे जागतिक बाजारात कापूस भाव जास्त त्यातच आयात शुल्क त्यामुळे व्यापाऱ्यांना जागतिक बाजारातून देशात कापूस आयात करणे फायदेशीर ठरणार नाही.
शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कापूस असेल तर कापूस विक्री स्वतःचा निर्णय घेऊनच करणे फायदेशीर, कारण कापूस भाव किती वाढतील किती घटतील या बद्दल कोणतेही कापूस तज्ञ 100 टक्के खात्री देऊ शकता नाही धन्यवाद…