कापसाची आवक वाढली कापूस भाव घसरले;
देशात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे कापसाचे भाव कमी होत असल्याची माहिती कापूस तज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेने जानेवारी महिन्यात या वर्षी कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे कापूस भाव कमी होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.
गेल्या वर्षी देशात दररोज एक लाख कापूस गाठींची आवक होत होती तीच आवक या वर्षी मात्र दुप्पट होत असल्याची माहिती कापूस तज्ञांनी दिली आहे. कापूस आवक वाढली की कापूस भाव घसरतात त्यामुळे सध्या कापसाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसून येत आहे.
यंदा खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट दिसून आली आहे. कापूस उत्पादक घटले म्हणून या वर्षात कापसाला सोन्याचा भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु उलट कापूस भाव दररोज कमी होत आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा कमी पावसामुळे याही राज्यात कापसाचे उत्पादन घटले आहे. देशात एकूण 280 लाख गाठींचे उत्पादन ही शक्य नसल्याची माहिती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सरकीचे भाव 3200 रुपये प्रति क्विंटल होते तर या वर्षी जानेवारी महिन्यात तब्बल 500 रुपयाने घसरले आहे तर सध्या जानेवारी महिन्यात सरकीचे भाव 2700 रुपये वर येऊन पडले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सध्या कापूस हमी भावापेक्षा तब्बल 500 रुपये प्रति क्विंटल कमी दरावे विकावा लागतो आहे.
तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ही चिंता वाढली आहे सोयाबीन भावात मोठी घट. सोयाबीन भाव 4800 ते 4900 वरून 4300 ते 4400 रुपये प्रति क्विंटल वर येईल पडले आहे.
हरभरा काढणी होण्याअगोदरच हरभरा भावात घसरण दिसून येत आहे.
मार्च महिन्यात पर्यंत कापसाची आवक कमी होऊन कापूस भाव फेब्रुवारी व मार्च महिन्यात वाढण्याची शक्यता कापूस तज्ञांनी व्यक्त केली आहे.