2024 मध्ये खर्च दुष्काळ आहे का?
(Monsoon update 2024) शेतकरी मित्रांनो 2024 वर्षात दुष्काळ पडणार अशी बातमी सध्या खूपच पसरत आहे. खरच 2024 मध्ये दुष्काळ आहे का, सध्या 2024 खरीप चा अंदाज बांधणे योग्य आहे का त्याच बद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेऊ.
शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे आजूनही शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचे सामने करावे लागत आहे. सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना 2023 मध्ये पडलेला दुष्काळ व नोव्हेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस सर्वाधिक नुकसानकारक ठरलेला आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या खूपच आर्थिक अडचणीत आहे. मात्र 2024 मध्ये तरी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती आणि त्यातच 2024 मध्ये दुष्काळ पडणार अशी बातमी खूपच झपाट्याने पसरत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.
खरच 2024 मध्ये दुष्काळ आहे का काय म्हणतात पंजाब डख:-
शेतकरी मित्रांनो काही हवामान संस्थांकडून 2024 वर्षाचे असे भाकीत करण्यात आले आहे की सुपर अल निनोचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होत असल्यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. परंतु हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात फक्त सुपर अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन आपण दुष्काळाचे भाकीत सांगू शकत नाही कारण पाऊस पाडण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
जस की थंडीची लाट कशी आहे, थंडीची लाट कोणत्या भागातून आली, किमान आणि कमाल तापमान किती आहे, दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात किती घसरण होते, वाऱ्याचा वेग आणि दिशा कशी आहे, वारे कोणत्या दिशेने वाहतात व हवेतील आर्द्रता अश्या अनेक गोष्टी पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे फक्त अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन आपण दुष्काळाचे भाकीत करू शकत नाही अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
तसेच यापुढे राज्यातील काही भागात, जसे की विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे कारण या भागात झाडांची संख्या कमी असल्यामुळे या भागातील जमिनीचे तापमान वाढत आहे त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपीट चा सामना या भागातील शेतकऱ्यांना यापुढे करावा लागेल.
शेतकऱ्यांना या पुढे दुष्काळ, गारपीट व अवकाळी पाऊस या पासून आपले पीक वाचवायचे असेल तर एका व्यक्तीने दोन झाडे लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे तरच या पुढची पिढी गारपीट व अवकाळी पावसापासून वाचेल.
शेतकरी मित्रांनो या नंतर 2024 खरीप हंगामासाठी काय महत्वाची अपडेट येणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ धन्यवाद…