Top tur variety:- शेतकरी बंधूंना नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणत लागवड केल्या जाणाऱ्या टॉप 03 तुरीच्या वाणाची (Top 03 Pigeon Pea Variety) माहिती घेणार आहोत.
शेतकरी बंधूंनो 2024 खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि विशेष महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन देखील झालेले आहे त्यामुळे मित्रांनो सध्या कापूस सोयाबीन यासारख्या खरीप पिकाची लागवड शेतकरी शेतकरी बंधूंनो 2024 खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात मान्सून चे आगमन देखील झालेले आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर पीक लागवड करण्यासाठी आता शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे. तसेच या खरीप हंगामात चांगला पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
शेतकरी बंधूंनो यावर्षी तुरीला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी तूर या पिकाची लागवड करू शकतात, कारण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन या पिकाची लागवड केली जाते त्या पाठोपाठ कापूस पिकामध्ये काही शेतकरी आंतरपीक म्हणून तूर या पिकाची लागवड करतात. गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि तुरीचे झालेले नुकसान तूर भाव वाढीसाठी कारणीभूत ठरला आहे. परंतु तुरीला चांगला भाव मिळाल्या मुळे य वर्षी शेतकरी तूर पिकाची लागवड करणार आहे. महाराष्ट्रातील ज्या शेतकरी बांधवांना तुर पिकाची लागवड करायची आहे अशा शेतकरी बांधवांना कोणत्या तुर वानाची निवड करावी त्याबद्दल मी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे ही पोस्ट शेअर नक्की करा.
1- BDN- 2013-41 (गोदावरी तूर):- कृषी संशोधन केंद्र, बदनापूर या ठिकाणी विकसित केलेला वान असून, BDN- 2013-41 या तुरीच्या वानाला गोदावरी या नावाने ओळखले जाते. गोदावरी ही तूर पांढऱ्या रंगाची आहे. ज्या शेतकरी बांधवांना पांढरी तूर लागवड करायची आहे ते शेतकरी गोदावरी तुरीची निवड करू शकता. गोदावरी या वाणाची कालावधी 165 ते 170 दिवसाची आहे. गोदावरी तुरीची लागवड करण्यासाठी जमीन कसदार आणि भारी असावी. एकरी उत्पादन 9 ते 10 क्विंटल इतके आहे. गोदावरी हा वान मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक आहे म्हणजे या वानावर मर आणि वांझ रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. गोदावरी तुरीच्या 100 दाण्याचे वजन सरासरी 11 ते 12 ग्रॅम इतके आहे.
2- BDN-711 तूर:- हा तुरीचा वान कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस केलेला आहे. Bdn-711 या तुरीच्या वानात मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. दुष्काळी परिस्थितीत हा वान चांगला उत्पादन देतो. Bdn-711 तुरीचा हा वान 150 ते 155 दिवसात म्हणजे कमी कालावधीत काढणीस येणारा वान आहे. वांझ रोगास सहनशील. दाण्याचा रंग पांढरा आहे. डाळ निर्मित करण्यासाठी या वाणाचा वापर केला जातो.
3- BDN-716 तूर:- हा तुरीचा वान मध्येम कालावधीचा असून या वाणाची कालावधी 165 ते 170 दिवसाची आहे. या तूरीच्या दाण्याचा रंग लाल आहे. हा तुरीचा वान मर आणि वांझ रोगास सहनशील आहे. त्यामुळे या तुरीत मर रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. भारी जमिनीसाठी शिफारस केलेला वान असून एकरी अधिक उत्पादन देणारा वान आहे धन्यवाद…