खुशखबर; ऑगस्ट महिन्याच्या या तारखेला 100 टक्के सूर्यदर्शन होणार? पंजाब डख live.. Panjab Dakh Havaman Andaj August 2024..
व्हायरल फार्मिंग :- ज्या भागातील शेतकरी पावसाला कंटाळले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑगस्ट महिन्याच्या या तारखेला होणार सूर्यदर्शन. आज दिनांक/ 3 ऑगस्ट पासून पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी थोड्या प्रमाणात सूर्यदर्शन आणि भाग बदलत आज पासु दिनांक/ 9 ऑगस्ट पर्यंत दररोज जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी अंदाज वर्तवला आहे. (Panjab Dakh Havaman Andaj August Month).
तसेच आजपासून दिनांक/ 9 ऑगस्ट पर्यंत पडणाऱ्या पावसाचा जोर सर्वाधिक कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात राहणार असून या भागात दुपार पर्यंत सर्वदुर ढगाळ वातावरण राहणार असून, दुपार नंतर ढग दाटून येतील आणि भाग बदलत काही भागात मोठ्या थेंबाचा पाऊस कमी वेळ पण जोरदार होईल असा अंदाज डख यांनी दिला आहे. दुपार पर्यंत उघड मिळत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केली नसेल असे शेतकरी फवारणी करून घेऊ शकता असा सल्ला डख यांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करून पाहा..
जुलै महिन्यात मागील काही दिवसांपासून सरासरीपेक्षा जोरदार पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला पाऊस थांबेल अश्या अनेक गोष्टी ऐकायला मिळत होत्या परंतु अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे पुन्हा दिनांक/ 8 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम असेल परंतु हा पाऊस सर्वदूर झडीचा नसून भाग बदलत ज्या भागात पडला त्या ठिकाणी वावरातून पाणी निघेल असा जोरदार होणार आहे. त्यामुळे जसी वेळ मिळेल फवारणी करून घ्यावी.
शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नाचं निवारण करत काल दिनांक/ 2 ऑगस्ट रोजी पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून, त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे की राज्यात फक्त 8 ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार असून दिनांक/ 9 ऑगस्ट पासून राज्यात सर्वदूर सूर्यदर्शन होईल अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली आहे.