खुशखबर कापूस होणार 8 हजार रुपये? आज कापला मिळाला 7650 रुपये भाव

Cotton latest news:- खुशखबर खुशखबर मागील चार महिन्यातील सर्वात जास्त कापसाला भाव आज दिनांक/ 17 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी 7650 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला आहे.

आजचे कापूस बाजार भाव
खुशखबर खुशखबर मागील चार महिन्यातील सर्वात जास्त कापसाला भाव आज दिनांक/ 17 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी 7650 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो जागतिक बाजारात कापूस वायदे वाढत असून भारतीय बाजार पेठेत देखील कापूस दरात मोठी सुधारणा दिसून येत आहे. दिनांक / 16 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा या बाजार समिती मध्ये कपासला सर्वाधिक भाव 7500 रुपये मिळाला होता हा भाव राज्यातील बाजार समिती पैकी सर्वात जास्त मिळालेला भाव ठरला असून आज दिनांक/ 17 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी 7650 रुपये सर्वाधिक भाव मिळून या बाजार समितीने देऊळगाव राजा बाजार समितीचे रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला मध्ये आज कापसाला 7600 रुपये ते 7650 रुपये असा भाव मिळाला आहे.

दिनांक / 15 फेब्रुवारी रोजी देखील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या बाजार समिती मध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव 7500 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला होता परंतु आज दिनांक / 17 फेब्रुवारी तब्बल 150 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ होऊन 7650 रुपये प्रति क्विंटल कापूस विकला आहे.

दिनांक / 15 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7200 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति खंडी रुई चे भाव वाढले असून देशातील बाजार समिती मध्ये देखील कापूस बाजार भावात पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढल्यास भारतीय कापसाला चांगला भाव मिळण्याची संधी असल्याची माहिती कापूस तज्ञांनी दिली आहे.

शेतकरी मित्रांनो 70 ते 80 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे परंतु तुमच्याकडे जर कापूस असेल तर टप्यात विक्री करने फायद्याची ठरेल असा सल्ला कापूस तज्ञांनी दिला आहे.

बाजार समिती अकोला या ठिकाणी आज दिनांक/ 17 फेब्रुवारी रोजी लोकल कापसाची आवक 91 क्विंटल झाली आहे तर कमीत कमी दर 6888 रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 6945 रुपये तर जास्तीत जास्त दर 7011 रुपये प्रति क्विंटल भाव भेटला आहे.

बाजार समिती मारेगाव या ठिकाणी आज कापसाची एकूण आवक 1462 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 6650 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 6950 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

अकोला बोरगाव मंजू या बाजार समिती मध्ये आज कापसाला कमीत कमी दर 7100 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये कापसाची एकूण आवक 3100 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 6400 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *