खुशखबर, नागरिकांना मिळणार केंद्र सरकारकडून स्वस्त दरात भारत राईस, भारत डाळ, भारत आटा व हरभरा बघा सविस्तर माहिती….
Viral farming:- मित्रांनो 2024 ची लोकसभा व विधानसभा निवडणुक जवळ येत असून देशातील अर्थव्यवस्था (Economy) सुरळीत ठेवण्यासाठी, महागाईवर (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) देशात वेगवेगळ्या योजना (Scheme) राबवण्यात येत आहे. तांदूळ (Rice) हे देशातील नागरीकांचे एक महत्वाचे खाद्य आहे, त्यामुळे राईस वर येणारी महगाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून Bharat Rice Yojana (भारत राईस योजना) राबवली जात आहे. या योजनेच्या माध्येमातून देशातील नागरिकांना स्वस्त दरात भारत राईस (Bharat rice) पुरवठा केला जाणार असून यामुळे देशातील महागाई (Inflation) नियंत्रणात राहू शकते असा केंद्र सरकारचा विचार आहे.
भारत राईस (Bharat Rice) योजनेमुळे देशातील गोर गरीब नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे, कारण बाजारातील किरकोळ दर अंदाजे 40 ते 45 रुपये प्रति किलो असून भारत राईस योजनेमुळे गोर गरीब नागरिकांना 29 रुपये प्रति किलो या दराने राईस (तांदूळ) मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राईस मध्ये वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
मागील एका वर्षापासून तांदुळाच्या किरकोळ किमतीत मोठी वाढ दिसून आली असून या वाढत्या किमतीमुळे देशातील गोर गरीब नागरिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भारत राईस योजनेअंतर्गत स्वस्त दरात तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
भारत राईस (Bharat rice) योजनेअंतर्गत तांदूळ 05 ते 10 किलोच्या पॅकिंग मध्ये विकला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या योजने द्वारे देशातील वाढती महागाई (Inflation) लक्षात घेऊन ही महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत राईस योजनेअंतर्गत 29 रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ दिले जाणार आहे, भारत आटा (Bharat aata) योजनेअंतर्गत 27.50 रुपये प्रति किलो या दराने आटा देण्यात येत आहे. तसेच भारत डाळ (हरभरा डाळ) या योजनेअंतर्गत 60 रुपये प्रति किलो या दराने हरभरा डाळ देण्यात येत आहे. तसेच टोमॅटो 40 रुपये प्रति किलो तर हरभरा 15 रुपये प्रति किलो या दराने देण्यात येणार आहे.
केंद्र सरकार नाफेड व NCCF च्या मध्येमातून या योजने अंतर्गत प्रति किलो या दराने विक्री करणार:-
1- हरभरा 15 रुपये प्रति किलो.
2- हरभरा डाळ 60 रुपये प्रति किलो.
3- भारत तांदूळ 29 रुपये प्रति किलो.
4- भारत आटा 27.50 रुपये प्रति किलो.