Latest Women Scheme in Maharashtra:- महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी अजून नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत काय आहे योजना संपूर्ण माहिती पाहू..
राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील महिलांसाठी नवीन दोन योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचा हेतू सरकारने दाखवून दिला आहे.
• मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना:- (Mukhaymantri Annapurna Yojana) शेतकरी मित्रांनो या योजनेला पर्यावरण सुरक्षित राहण्याच्या हेतूने मोठा भर देण्यात येणार आहे पर्यावरण संरक्षणाला साहाय्यभूत अशी ही योजना असणार आहे.
•राज्यातील महिलांसाठी ही एक नवीन योजना आखली असून या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या आरोग्याकडे बघून स्वच्छ इंधन पुरवठा करणे या योजनेचा हेतू आहे. राज्य सरकारकडून महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे त्यासाठी स्वच्छ इंधन पुरवठा करण्यासाठी भर देण्यात येणार आहे.
•मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
•महिलांसाठी एलपीजी गॅस वापर करणे सुरक्षित असल्याकारणाने या इंधनाच्या वापराला राज्य सरकारकडून प्राधान्य देण्यात येणार आहे.
•मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना होणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति माह 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा हेतू हा सरकारचा आहे तसेच वर्षाला 03 गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील आखलेली आहे.
•राज्यातील महिलांचे आरोग्य चांगले कसे राहतील महिलांचे आरोग्याच्या समस्या दूर कशा होतील या दृष्टिकोनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आखलेली आहे.
•एलपीजी गॅसचे वाढलेले भाव पाहता ही योजना राज्यातील महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तसेच महिलांचे आरोग्य देखील सुरक्षित राहील या हेतूने सुद्धा ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
• मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र?
राज्यातील ज्या नागरिकांकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहेत अशाच शेतकरी बांधवांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
• वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार का?
शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे असे शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच तुम्ही या योजनेसाठी पात्र असेल तर सर्वप्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर स्व खर्चाने खरेदी करायचे आहे आणि त्यानंतर या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे जमा करण्यात येणार आहे.
• पिंक रिक्षा योजना:- ( Pink Riksha Yojana).
राज्यातील महिलांना रोजगार मिळावा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आता राज्य सरकारने पिंक रिक्षा योजना देखील महिलांसाठी आखलेली आहे. पर्यावरण प्रदूषित होऊ नये त्यासाठी या दोन योजना आखलेल्या असून पिंक रिक्षा योजना या योजनेअंतर्गत सरकारी अनुदानातून राज्यातील महिलांना पर्यावरण पूरक पर्यावरण रक्षक करणारा ई- रिक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम राहतील असा सरकारचा प्रयत्न आहे.
तुम्हाला पिंक रिक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्षे आहे या वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षाचा आहे. पिंक रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणार 20% अनुदान तर बँकेतर्फे मिळणार 70% कर्ज लाभार्थी महिलांना केवळ 10 टक्के खर्च करण्याची गरज पडणार आहे.