खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टर पर्यंत मदत Nuksaan bharpai November 2023

खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टर पर्यंत मदत Nuksaan bharpai November 2023

 

नोव्हेंबर नुकसान भरपाई 2023
नोव्हेंबर नुकसान भरपाई 2023
नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांना मिळणार

नोव्हेंबर नुकसान भरपाई 2023 शासन निर्णय gr आला आहे, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी की वर्षाचा अखेर नोव्हेंबर 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदान स्वरूपात मदन करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. नोव्हेंबर या महिन्यात झालेल्या अवकाळी गारपीट व पावसामुळे एकूण 34 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये खालील जिल्ह्यात अधिक नुकसान झाले आहे हिंगोली, जालना, संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर,बुलढाणा, अकोला व परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान झालेले आहे.

जालना जिल्ह्यात जिरायत, बागायत व फळपिकांचे एकूण नुकसान 116946 हेक्टर इतके झाले आहे तर त्यात शेतकऱ्यांची संख्या 191219 इतकी आहे. छ. संभाजीनगर जिल्ह्यात जिरायत, बागायत व फळपिकांचे नुकसान 142184 हेक्टर इतके झाले आहे तर त्यात शेतकऱ्यांची संख्या 263964 इतकी आहे. हिंगोली जिल्ह्यात जिरायत व फळपिकांचे नुकसान 121887 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे तर शेतकऱ्यांची संख्या 257487 इतकी आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी शेतकऱ्यांची संख्या आहे त्या पाठोपाठ वर्धा जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांची संख्या आहे.

राज्यात सरकारच्या नवीन शासन निर्णय नुसार आता बागायत पिकाच्या नुकसानीसाठी प्रचलित दर 17,000 रू प्रति हेक्टर, (2 हेक्टर मर्यादा) आता मदतीचा वाढीव दर हा 27,000 रू प्रति हेक्टर, (3 हेक्टर मर्यादा). जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी प्रचलित दर 8,500 रू प्रति हेक्टर, (2 हेक्टरच्या मर्यादेत) आता मदतीचा वाढीव दर हा 13,600 रू प्रति हेक्टर असा केला आहे, (3 हेक्टर मर्यादेत). बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दर हा 22,500 रू प्रति हेक्टर, (2 हेक्टर मर्यादा) आता मदतीचा वाढीव दर हा 36,000 रू प्रति हेक्टर, (3 हेक्टरच्य मर्यादेत) आहे.

नुकसान भरपाई खालील जिल्ह्यात दिली जाणार आहे

ठाणे, पालघर, राजगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली म्हणजे एकूण 34 जिल्ह्यात नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

एकूण 34 जिल्ह्यात नुकसान झालेले हेक्टर क्षेत्र 1289353 इतके आहे तर त्यात शेतकऱ्यांची संख्या 2396061 इतकी आहे. त्यात जिरायत एकूण हेक्टर क्षेत्र 1018520 इतके आहे, तर बागायत क्षेत्र 166545 हेक्टर क्षेत्र आहे फळपीक हेक्टर क्षेत्र 104288 इतके आहे.

नोव्हेंबर नुकसान भरपाई यादी तुमच्या तालुक्यातील तलाठ्याकडे येतील व इ केवायसी करावी लागणार आहे त्यानंतरच शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई चे पैसे मिळतील ही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *