Ladki Bahin Yojana; लाडकी बहिण योजनेसाठी हे ऑनलाईन कागदपत्र चालणार!
लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून ज्या अर्ज दाराने अर्ज केला आहे अश्या अर्जदाराचे स्वतःचे बँक आधार लिंक खाते लागणार आहे, कारण DBT द्वारे पैसे तुमच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे जॉइंट खाते किंव्हा बंद पडलेले खते लाभार्थ्यांनी जोडू नये, तसेच प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की दिनांक/ 19 ऑगस्ट 2024 रोजी जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2.5 लाख खालील उत्पन्नाचे प्रमाणपत्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता परंतु त्यानंतर या योजनेत अनेक छोट मोठे बदल करण्यात आले असून आता ज्या महिलांचे नाव पिवळे आणि केशरी रेशन कार्ड मध्ये आहे अश्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा महिन्याला 1500 रुपये भाव घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज पडणार नाही. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या अटीची पूर्तता शिथिल करण्यात आली.
• पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे पण फाटले, खराब झाले तर अजिबात घाबरू नका ई रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता चालणार आहे. राज्य सरकारने मोठा पाऊल उचला आहे आणि आता ज्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हरवले आहे किंव्हा खराब झाले आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने ई रेशन कार्ड या योजनेसाठी देता येणार आहे.
• ई शिधापत्रिका लाडक्या बहिणींना फॉर्म भरण्यासाठी चालणार:- लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुमचे रेशन कार्ड वळखु येत नसेल किंव्हा हरपले असेल तर तुम्ही फ्री मध्ये ई रेशन कार्ड डाऊनलोड करून ते या लाडक्या बहीण योजनेसाठी अपलोड करून शकता. तसेच तुमच्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, पिवळे रेशन कार्ड किंव्हा केशरी रेशन कार्ड यापैकी कोणतेही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत स्वयघोषणापत्र फॉर्म भरून लाभार्थ्याचा पासपोर्ट फोटो जोडून तुम्हाला स्वयघोषणापत्र या योजनेसाठी अपलोड करता येणार आहे.
• फॉर्म कोणत्या भाषेत भरावा:-
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कोणत्या भाषेत भरावा असा प्रश्न राज्यातील या योजनेसाठी लाभार्थी महिलांना पडलेला आहे. या योजनेचा फॉर्म इंग्लिश मध्ये भरणे आवश्यक आहे.
मित्रांनो अधिक माहितीसाठी Youtube व्हिडिओ पहा..