खुशखबर; सूर्यदर्शन होणार! शेतीचे कामे करून घ्या पुन्हा राज्यात पाऊस तोडकर हवामान अंदाज

सूर्यदर्शन केव्हा होणार! तोडकर यांचा तातडीचा हवामान अंदाज लगेच पाहा..

तोडकर हवामान अंदाज 29 जुलै सूर्यदर्शन
सूर्यदर्शन केव्हा होणार! तोडकर यांचा तातडीचा हवामान अंदाज लगेच पाहा..

व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडला असेल की राज्यात सूर्यदर्शन कधी होणार? तर तोडकर यांचा नवीन सविस्तर झाली वाचा..

माहिती खूप महत्वाची आहे आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

उदया दिनांक/ 29 जुलै विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात कोरडे वातावरण पाहायला मिळणार आहे, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन किंव्हा कापूस दुसरी फवारणी केली नसेल तर या भागातील शेतकऱ्यांनी फवारणी करून घ्यावी, तसेच अनेक शेतकऱ्यांचे खत व्यवस्थापन बाकी आहे अश्या शेतकऱ्यांनी उदया खत व्यवस्थापन देखील करून घेण्यासाठी योग्य वातावरण राहणार आहे.

आज दिनांक/ 28 जुलै आज संपूर्ण दिवसभर जारी मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस पाहायला मिळाला असला तरी उदया मात्र सकाळ नंतर ढगाळ वातावरण कमी प्रमाणत पाहायला मिळणार असून तुम्हाला शेतीचे कामे पूर्ण करता येईल असे वातावरण उदया दिनांक/ 29 जुलै रोजी राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांनी दिली आहे.

तसेच खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात उदया दिनांक/ 29 जुलै रोजी 11 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून त्यांनतर याही भागात फवारणी योग्य वातावरण पाहायला मिळणार आहे.
उदया दिनांक/ 29 जुलै रोजी नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम भागात, मालेगाव, वैजापूर आणि सांगली या भागात देखील उदया वातावरण क्लिअर होणार आहे. या भागात सूर्यदर्शन होणार असून शेती कामे पूर्ण करता येईल..

उदया दिनांक/ 29 जुलै पूर्व वातावरण क्लिअर राहणार असून तुरळक ठिकाणी फवारे उडविले सारखा पाऊस पडेल परंतु तुम्हाला शेतातील कामे पूर्ण करता येईल असा उद्याचा दिवस राहणार आहे.

उदया दिनांक/ 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात वातावरण क्लिअर राहणार असून पुढील तीन दिवसात शेतीचे कामे पूर्ण करून घ्या असा सल्ला हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांनी दिला आहे.

परंतु दिनांक/ 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट पुन्हा रिमझिम पाऊस झडीचे स्वरूप पाहायला मिळणार आहे..
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पहा…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *