खुशखबर; सोयाबीन व कापुस 5000 रुपये अनुदान मिळणार gr आला..

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; 2023 सोयाबीन व कापुस 5000 रुपये अनुदान मिळणार gr आला..

कापूस व सोयाबीन अनुदान gr आला kapus soyabean anudan
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; 2023 सोयाबीन व कापुस 5000 रुपये अनुदान मिळणार gr आला..

व्हायरल फार्मिंग : Soyabean and Kapus Anudan 2023 शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आपला व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.

गेल्या वर्षी 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान झाले. सोयाबीन व कापूस पिकास बाजार भावही कमी मिळाला त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा खर्चही निघालेला नसून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून त्या 2023 वर्षातील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र सरकारने 2 हेक्टर मर्यादित 5,000 रुपये अनुदान आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला असून या बाबद आज दिनांक/ 29 जुलै 2024 रोजी gr निर्गमित केला असून वर्ष 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा gr मर्यादित आहे. म्हणजे फक्त हे अनुदान वर्ष 2023 सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कापूस हे राज्यातील अत्यंत महत्वाचे पीक असून, या पिकाच्या लागवडीपासून तर वेचनिपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. कापूस घरात आल्यानंतरही काही कापसाला काही कारणामुळे कमी दर मिळतात आणि शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला जातो त्यामुळे कापूस उत्पादन शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादित 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सोयाबीन हे सुध्दा राज्यातील एक महत्वाचं पीक आहे परंतु या वर्षी सोयाबीन मालास हमी भवपेक्षाही कमी दर मिळाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडला आहे. तुम्ही 2023 मध्ये सोयाबीन व कापुस उत्पादन घेतले असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे.

•महत्वाची बाब :-

महाराष्ट्र राज्यातील वर्ष 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1000 रुपये सरसकट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच या पेक्षा अधिक क्षेत्र असल्यास 2 हेक्टर मर्यादित 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

• क्षेत्र मर्यादा :-

0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्यास 1000 रुपये सरसकट देण्यात येणार आहे.
0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असल्यास 2 हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5000 रुपये देण्यात येणार आहे.

• अनुदान बजेट :-

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी 1548.34 कोटी तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी 2646.34 कोटी म्हणजे एकूण बजेट 4194.68 कोटी खर्च करण्याची मान्यता देण्यात आली आहे.

• आटी/निकष :-

1- ई-पिक पाहणी – वर्ष 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद ॲप किंव्हा पोर्टलद्वारे केली असेल असे नोंदणीकृत शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहणार आहे.
2- 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्यास 1000 रुपये सरसकट देण्यात येणार आहे.
3- 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असल्यास 2 हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5000 रुपये देण्यात येणार आहे.
4- आधार बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे कारण सदर योजनेचे अनुदान थेट बँक खात्यात DBT द्वारे पात्र शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे.

• योजनेची मर्यादा :-

या योजनेची मर्यादा अशी आहे की वर्ष 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे.
अधिक माहितीसाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन भेट दयावी किंव्हा हा YouTube व्हिडिओ पाहा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *