खुशखबर यंदा मान्सून (Monsoon 2024 big update) जोरदार बरसणार सुपर अल निनोचा प्रभाव जून पर्यंत वासरणार?
2024 monsoon news:- प्रशांत महासागरातील तापमान कमी होणार असून पुढील काळात सुपर अल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदा जून महिन्या पर्यंत अल निनोचा प्रभाव वसरणार असून लानिनो चा प्रभाव चांगला राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सुपर अल निनोचा प्रभाव म्हणजे महासागरातील पुष्टभावरील वाढलेले तापमान. यामुळे देशातील काही भागात खूपच कमी पाऊस (दुष्काळी परिस्थिती) किंव्हा काही भागात अती मुसळधार ढगफुटी पाऊस दिसून येतो. अर्थात सुपर अल निनोचा प्रभाव म्हणजे काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी होय. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.
यंदा मान्सून हंगामात ला नीना ची परस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी चांगला बरसणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक व्यक्त करत आहे.
Latest monsoon update:- 2023 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे चिंतेत पडलेल्या शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 2024 मान्सून हंगामात सुपर अल निनोचा प्रभाव जुन महिन्या पर्यंत कमी होणार असून यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान तज्ञ सांगत आहेत.
सुपर अल निनोचा प्रभाव होणार कमी प्रशांत महासागरातील वाढलेले तापमान 2024 मान्सून हांगमापर्यंत म्हणजे जुन महिन्या पर्यंत कमी होणार असून लानिनो चा प्रभाव वाढण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे यंदा चांगला पाऊस बरसणार असा अंदाज आहे…