Nuksan bharpai 2020:- नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो तब्बल चार वर्षानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की दिनांक 3 जून 2020 रोजी जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये चक्रीवादळाच्या नैसर्गिक नुकसानीमुळे हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ते नुकसान भरून काढण्यासाठी 12 मार्च 2024 रोजी शासनाने एक जीआर मंजूर केला आहे त्या जीआर मुळे आता जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल चार वर्षानंतर नुकसान भरपाई मिळणार आहे.
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील एकूण 3865 बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 15 कोटी 48 लाख रुपये इतके अनुदान शासनाने मंजूर केले आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल चार वर्षानंतर दिलासा देणारी बातमी आहे की हिरडा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तब्बल 15 कोटी 48 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे. दिनांक 3 जून 2020 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये मोठे नैसर्गिक संकटामुळे म्हणजे चक्रीवादळामुळे या जिल्ह्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तेच नुकसान भरून काढण्यासाठी आता शासनाने तब्बल चार वर्षानंतर म्हणजे 12 मार्च 2024 रोजी शासनाने जीआर काढला आहे की पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 कोटी 48 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी तब्बल चार वर्षानंतर ही एक अत्यंत आनंदाची बातमी ठरली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर या दोन तालुक्यांमध्ये दिनांक 3 जून 2020 मध्ये चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या दोन तालुक्यातील हिरडा शेती पिकाच्या नुकसानी करिता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांचे 7066.79 क्विंटल हिरडा शेती पिकाच्या नुकसानी करिता एकूण 3865 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 15 कोटी 48 लाख रुपये अनुदान मंजूर करून दिले आहे.
शेतकरी मित्रांनो पीक पेरणी पासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते पिकांचे नुकसान होते ते नुकसान भरून काढण्यासाठी शासनाद्वारे शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. मित्रांनो दरवर्षीच अतिवृष्टीमुळे, पुरामुळे किंवा चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते ते नुकसान भरून काढण्यासाठी पुढील हंगामात एक आर्थिक मदत व्हावी त्यासाठी शासनाद्वारे शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत दिली जाते.