ज्वारी करणार शेतकऱ्यांना मालामाल? पाहा आजचे ज्वारी बाजार भाव.
Jawar bajar bhav:- ज्वारी हे राज्यातील एक महत्वाचं तृणधान्य पीक आहे. रब्बी हंगामात या पिकाची लागवड सर्वाधिक केली जाते. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले होते त्यामुळे हरभरा पिकास पर्याय पीक म्हणून ज्वारी या पिकाची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड झाली. ज्वारी या तृणधान्य पिकाची लागवड मराठवाडा व पच्छिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात केली जाते.
ज्वारी बाजार भाव कसे:- (Jawar bajar bhav update).
सध्या ज्वारी तृणधान्य पिकास राज्यातील काही बाजार समिती मध्ये 4000 ते 4500 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव बघायला मिळत आहे. त्यामुळे ज्वारी यंदा शेतकऱ्यांना मालामाल करण्याची दात शक्यता आहे. कारण ज्वारी चे भाव मार्च व एप्रिल मध्ये आणखीन वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहे.
शेतकरी मित्रांनो यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांचा हातून गेला आहे त्याच बरोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून या वर्षी ज्वारी पिकाचे लागवड वाढली आहे. त्याच बरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी ज्वारीला चांगला भाव पाहायला मिळत आहे.
जानेवारी महिन्यात ज्वारीचे भाव कमी झालेले दिसून आले परंतु पुन्हा एकदा ज्वारी भावात तेजी कायम आहे. पुढील महिन्यात ज्वारी ची आवक वाढणार असून ज्वारी चे दर देखील वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहे.
दिनांक / 17 फेब्रुवारी रोजी अकोला बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची 15 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2505 क्विंटल तर जास्तीत जास्त दर 2740 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. नागपूर बाजार समिती मध्ये हायब्रीड ज्वारीची एकूण आवक 43 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 3400 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर हा 3600 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. अमरावती बाजार समिती मध्ये लोकल ज्वारीची एकूण आवक खूपच कमी म्हणजे फक्त 03 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 2200 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 3235 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
(ता. 17 फेब्रुवारी 2024) सोलापूर बाजार समिती मालदांडी ज्वारीची एकूण आवक 13 क्विंटल झाली असून त्यास 3835 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. मंगळवेढा बाजार समिती मध्ये ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला आहे या बाजार समिती मध्ये एकूण आवक 222 क्विंटल झाली असून कमीत कमी दर हा 2300 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर हा 5010 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. तुळजापूर बाजार समिती मध्ये पांढरी ज्वारी एकूण आवक 70 क्विंटल झाली आहे तर त्यास कमीत कमी दर 2500 रुपये व जास्तीत जास्त दर हा 3500 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. गेवराई बाजार समिती मध्ये रब्बी ज्वारीची एकूण आवक 31 क्विंटल झाली असून कमीत कमी दर हा 2000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर हा 3419 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
शाळू जवरी बाजार भाव:-
जालना बाजार समिती मध्ये शाळू ज्वारीची एकूण आवक 1979 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 1800 रुपये तर जास्तीत जास्त दर 3491 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. सांगली बाजार समिती मध्ये शाळू ज्वारीची एकूण आवक 195 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 3250 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 3500 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद….