डॉ रामचंद्र साबळे; आज 29 जुलै संपूर्ण आठवड्याचा नवीन हवामान अंदाज…
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो आज दिनांक/ 29 जुलै रोजी पावसाचा जोर थोडा कमी झाला असून या संपूर्ण आठवड्यात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज डॉ रामचंद्र साबळे यांनी आज वर्तवला आहे. कसा असेल या आठवड्यात पाऊस? कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस? संपूर्ण माहिती या लेखात पाहू..
नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती विषयक आणि हवामान विषयक माहिती साठी आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा..
राज्याच्या उत्तरेकडील भागावर 1000 हेक्टा पास्कल व मध्य भागापासून दक्षिण भागापर्यंत 1002 हेक्टा पास्कल हवेचा दाब राहणार आहे.
आज दिनांक/ 29 जुलै सोमवार आज कोकणात पावसाचा जोर कायम राहील, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर थोडा कमी होणार असून ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन राहील तर काही भागात मध्यम व हलका पाऊस होणार आहे. परंतु उदया दिनांक/ 30 जुलै पासून पावसाचा जोर कमी होणार आहे.
आज कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.
• दिनांक/ 31 जुलै पासून आठवडाभर हवेचे दाब वाढणार:-
बुधवार पासून राज्यातील हवेचा दाब वाढणार असून तो 1002 ते 1004 हेक्टा पास्कल राहणार असून त्याचा परिणाम पावसाचा जोर कमी होण्यासाठी दिसून येणार आहे, त्यामुळे बुधवार पासून आठवडाभर मध्यम ते हलका पाऊस राहणार आहे तर काही काळ उघडीप राहणार असल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढणार असून पावसाचे प्रमाण कमी होणार आहे, पावसाचा जोर आठवडाभर राहील परंतु काही कल उघडीप काही वेळा मध्यम व हलका पाऊस सुरू राहील.
तसेच प्रशांत महासागरातील पुस्टभागवरील तापमान घसरले असून लानीना चा परिणाम सुरू झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर पुढील दोन महिनेही पावसाचे प्रमाण सरासरी चनगले राहणार असल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
• आजचा हवामान अंदाज:-
• मध्येम व हलका पाऊस कुठे –
नगर, अकोला, गडचिरोली, कोल्हापूर, हिंगोली, जालना, जळगाव, लातूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, सांगली, सातारा, वाशिम आणि यवतमाळ.
• जोरदार पाऊस कुठे –
अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि वर्धा..
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..