डॉ रामचंद्र साबळे म्हणतात सोमवार, मंगळवार व बुधवार असा असेल पाऊस? काही भाग सुटणार हवेचा दाब 1006 हेक्टा पास्कल..

रामचंद्र साबळे यांनी सांगितला पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज.. आज सोमवार, मंगळवार व बुधवार पावसाचा अंदाज कसा.

पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज डॉ रामचंद्र साबळे
रामचंद्र साबळे यांनी सांगितला पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज..

IMD Alert – आज दिनांक/ 19 ऑगस्ट वार सोमवार, मंगळवार व बुधवार पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज कसा आहे? डॉ रामचंद्र साबळे यांनी सांगितलेला आहे. डॉ रामचंद्र साबळे यांनी नवीन अंदाज दिला असून, पुढील तीन दिवस राज्यात पाऊस कसा सविस्तर माहिती घेऊ.

मान्सून ट्रफ म्हणजे काय?

डॉ रामचंद्र साबळे यांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी नवीन अंदाज दिला आहे. त्यात डॉ रामचंद्र साबळे म्हणतात मान्सून ट्रफ हा बिकानेर पासून तर बांगलादेश पर्यंत आहे. दिनांक/ 17 तारखेला दक्षिण बंगालमध्ये हवेचा कमी दाब सक्रिय झाल्यामुळे पाऊस होणार आहे. तसेच डॉ रामचंद्र साबळे यांनी मान्सून ट्रफ म्हणजे काय सांगितले आहे? मान्सून ट्रफ बिकानेर पासून बांगलादेश पर्यंत आहे. म्हणजे बिकानेर पासून बांगलादेश पर्यंत ढगांची दाटी वाढली असून त्या पट्टयात पाऊस होत असून त्याला मान्सून ट्रफ म्हणतात.

डॉ रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज पुढील तीन दिवसाचा कसा आहे?

आज दिनांक/ 19 ऑगस्ट पावसाचा जोर कायम राहणार असून दिनांक/ 20 ऑगस्ट किनारपट्टी परिसर सोडता राज्यातील इतर भागात जोर वसरणार आहे.

आज सोमवार, मंगळवार व बुधवार पावसाचा अंदाज कसा असणार?

डॉ रामचंद्र साबळे म्हणतात, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

डॉ रामचंद्र साबळे म्हणतात, आज 19 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर मंगळवार व बुधवारी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच खानदेशात नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात सोमवार, मंगळवार व बुधवारी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर :-

हलका ते मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यात कुठे :-
धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना या जिल्ह्यांना हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मध्यम पावसाचा अंदाज कुठे :-

लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे.

पश्चिम विदर्भ पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज कसा?

हलका ते मध्यम पाऊस :-

बुलढाणा व अमरावती जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

हलका पाऊस :-

पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

मध्यम ते जोरदार पाऊस :-

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मध्य विदर्भातील पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज कसा आहे?

हलका ते मध्यम पाऊस :-

यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.

मध्यम पाऊस :-

वर्धा व नागपूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

पूर्व विदर्भ पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज कसा आहे?

मध्यम पाऊस :-

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे :-

डॉ रामचंद्र साबळे यांनी राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नगर जिल्ह्यात आज सोमवार रोजी जोरदार पाऊस तर मंगळवार व बुधवार हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस हवेचा दाब कसा राहणार?

महाराष्ट्र राज्यावर पुढील तीन दिवस 1006 हेक्टा पास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, काही ठिकाणी पाऊस काही भागात उघडीप राहणार आहे. वरील सांगितल्या प्रमाणे जील्ह्यानुसार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस राहणार आहे.

अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *