Cloudy And Rainy Weather Crop Management:- ढगाळ आणि पावसाच्या वातावरणात सोयाबीन व कापूस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे संपूर्ण माहिती..
शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस पिकाची लागवड करून जवळपास एक महिना होत आलेला आहे. जुन महिन्यात जारी पावसाचे प्रमाण सरासरी कमी असेल तरी जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जास्त पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकात वेग वेगळ्या नवीन समस्या दिसून येतात, जसे की किडींचा प्रादुर्भाव, अळ्यांचा प्रादुर्भाव, मूळ सड, खोड किडींचा प्रादुर्भाव, पावडरी रोग, बुरशीजन्य रोग अश्या अनेक समस्या आपल्या पिकात या ढगाळ वातावरणामुळे दिसून येतात. त्यामुळे सोयाबीन व कापुस पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य फवारणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. तसेच ढगाळ वातावरण असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
• कीड नियंत्रण:-
शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन व कापूस पिकात मोठ्या प्रमाणात पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव होतो तसेच रस सोषण किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे पावसाची उघडीस मिळाल्यास फवारणी मध्ये स्टिकर वापरून कीटकनाशक व अळी नाशक ची फवारणी करून घ्यावी.
• रोग नियंत्रण:-
ढगाळ वातावरण व पावसामुळे वातावरणातील अद्रता वाढते त्यामुळे नक्कीच आपल्या सोयाबीन व कापूस पिकाच्या पानावर किंव्हा फांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो ही गोष्ट लक्षात घेतला सोयाबीन व कापूस पिकावर फवारणी करण्यासाठी कार्बेन्डाझिम व मॅन्कोझेब हे घटक असलेल्या बुरशीनाशक फवारणी करावी परंतु पावसाचे वातावरण असेल तर फवारणी मध्ये स्टिकर वापरावे.
• शेतातील पाण्याचे नियोजन:-
शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात अतिरेक होणाऱ्या पावसामुळे शेतात साचलेले पाणी हे मूळ कुज किंव्हा मूळ सड तसेच पानावरील बुरशी वाढवण्यासाठी खूप कारणीभूत ठरते, त्यामुळे शेतात साचलेले पाणी सर्व प्रथम त्या पाण्याची शेतातून बाहेर काढण्याची सोय करावी.
• ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ थांबते:-
शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल पिकाच्या जोमदार वाढीसाठी सूर्य प्रकाश खूप गरजेचे असतो. ढगाळ वातावरण किंव्हा सतत पाऊस असेल तर झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते त्यामुळे कालांतराने झाडाची पाने पिवळी पडतात व वाढ थांबते त्यामुळे पिकावर फवारणीमध्ये अमिनो ऍसिड वापरणे गरजेचे आहे.