थंडीत बाजरी भाकर शरीरासाठी इतकी गुणकारी:- बाजरी भाकर खाण्याचे फायदे काय आहे.
Viral Farming:- बाजरी भाकर:- (Bajari Bhakar) शेतकरी मित्रांनो बाजरी भाकर मनल की चांगल्या चांगल्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटते त्यातच हिरवीगार मिरचीच्या ठेस्याची सांगड घातल्यास 5 स्टार हॉटेलचे जेवण ही फिके पडते. तीळ घालून तयार केलेली बाजरी भाकर आणि ठेसा हिवाळ्यात खायला वेगळीच मजा असते. हिवाळ्यात शेतात निवांत झाडाखाली बसून तीळ घालून तयार केलेली बाजरी भाकर आणि ठेसा खायची वेगळीच मजा आहे जी तुम्हाला कुठ्ल्याही 5 स्टार हॉटेल मध्ये बघायला मिळणार नाही. कारण घरी आजीबाई ने तयार केलेल्या भाकरीची चवच वेगळी असते.
हिवाळ्यात मानवी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी खासकरून हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर ठरते त्यामुळे अनेक लोक हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे पसंद करतात.
बाजरी पासून तुम्हीच खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून चांगला अनुभव घेऊन शकता. बाजरी भाकर, बाजरी चे वडे, बाजरी चे धीपटे असे अनेक पदार्थ बाजरी पासून बनवता येतात. ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरी मध्ये तीळ घालून या भाकरीची चव आजुन वाढवली जाते.
थंडीत बाजरी भाकर खाण्याचे काय फायदे आहेत:-
1- आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्वाचे पीक आहे.
2- बाजरी भाकर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्हाला जर थकवा जवत असेल तर बाजरी भाकर खाणे उत्तम आहे.
3- बाजरी भाकर शक्यतो थंडी मध्ये खावी कारण या भाकरी मुळे शरीरातील आतील तापमान वाढते.
4- मधुमेह नागरिकांसाठी बाजरी भाकर खूप फायद्याची ठरते.
5- जास्त गर्मी असल्यास बाजरी भाकर खाणे शक्यतो टाळावे.
6- 100 ग्राम बाजरी धाण्यातून जवळपास 350 ते 360 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते.
7- बाजरी भाकर खाल्यामुळे प्रथिने भरपूर मिळतात.
8- कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम असे पोषक खनिज पदार्थ बाजरी भाकरी मधून मिळतात धन्यवाद…