तोडकर हवामान; आज 31 जुलै सूर्यदर्शन पण या भागात जोरदार पाऊस..
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांनी आज अत्यंत पहत्वाचा हवामान अंदाज दिला आहे. अशोक तोडकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक/ 31 जुलै बुधवार रोजी राज्यात काही भागात 4 ते 5 वाजे पर्यंत सूर्यदर्शन असेल त्यामुळे फवारणी बाकी असेल तर फवारणी करून घ्यावी पण दुपारी चार वाजेपर्यंत फवारणी चालणार आहे, कारण ज्या भागात सूर्यदर्शन कडक होईल त्या भागात गर्मी तयार होऊन मोठ्या थेंबाचा पाऊस पडणार असल्याची माहिती अशोक तोडकर यांनी दिली आहे. (Ashok Todakr Havaman Andaj).
शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती विषयक व हवामान विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
आज चंद्रपूर, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून हलका पाऊस होत राहील परंतु ज्या भागात सूर्यदर्शन अधिक त्या भागात दुपार नंतर जोरदार पाऊस होईल पाऊस कमी वेळ असेल पण शेतात पाणी साचेल असा होईल. त्यामुळे दुपार पर्यंत कीटकनाशक आणी बुरशीनाशक फवारणी करून घ्यावी त्यासाठी गरजेनुसार द्रावण तयार करावे, एकदाच मोठ्या प्रमाणात द्रावण तयार करू नये अन्यथा औषधाचे नुकसान होऊ शकते असा सल्ला अशोक तोडकर यांनी दिला आहे.
• दिनांक/ 31 जुलै 2024 IMD Alert :-
हवामान खात्याचा अंदाजानुसार आज विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात येलो अलर्ट जारी असून विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसेच कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट दिला असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे त्यामध्ये जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.
त्याचबरोबर सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून मध्येम पावसाचा अंदाज आहे.