तोडकर हवामान लाईव्ह; आज पासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार!
व्हायरल फार्मिंग : हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांचा नवीन अंदाज जाहीर झाला असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी विशेष अंदाची बातमी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात आज पासून पुढील तीन दिवस रात्रीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी हि खूप आनंदाची बातमी असेल कारण नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस पडलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बराच भाग पावसाने सोडला आहे.
• सतत धार पाऊस :-
आज दिनांक/ 23 जुलै पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात सतत धार पावसाचा जोर वाढणार नाही, अत्यंत मुसळधार किंव्हा अती मुसळधार पाऊस नसेल, परंतु नाशिक जिल्ह्यात रात्रीचा सतत धार पाऊस असेल. तसेच खानदेशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पुढील तीन दिवस थोड्या प्रमाणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता तोडकर यांनी व्यक्त केली आहे.
• कोकणात आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला असला तरी नाशिक, धुळे, नंदुरबार, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आजूनही मुसळधार पाऊस पडलेला नाही. परंतु जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रात्रीचा सतत धार पाऊस पडत आहे. आज दिनांक/ 23 जुलै पर्यंत नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून आज पासून पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे रात्रीची सतत धार पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
• आज रात्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि सिल्लोड भागात रिमझिम पाऊस राहण्याची अंदाज तोडकर यांनी व्यक्त केला आहे.
• पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा घाट परिसरातील भाग पावसाला कंटाळलेला असून त्या भागातील शेतकरी आता सूर्यदर्षणाची वाट पाहत आहे. परंतु पंढरपूर आणि मोहोळ या भागात हवेचा दाब अधिक असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे कारण या भागात पावसाचे ढग थांबत नाही.
• विदर्भात दिनांक/ 2 ते 3 ऑगस्ट पर्यंत पावसाचे प्रमाण कायम राहणार आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात उन आणि मुसळधार पाऊस अशी परिस्थिती राहणार आहे. पूर्व विदर्भातील ज्या भागात जास्त उन त्याभगर मुसळधार असा पाऊस राहील अशी माहिती अशोक तोडकर यांनी दिली आहे.
• मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे तर काही भाग आजूनही सोडलेला आहे. आज पासून पुढील तीन दिवस या भागातही थोड्या प्रमाणात उन, ढगाळ वातावरण आणि रात्रीचा पाऊस असे वातावरण राहणार आहे धन्यवाद..