थंडी वाढणार हवामान खात्याकडून इशारा

Weather update:- थंडी वाढणार हवामान खात्याकडून इशारा

थंडी वाढणार हवामान खात्याकडून इशारा
थंडी ची लाट

हवामान खात्याचा अंदाज राज्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील काही दिवस ढगाळ वातावरण व पाऊस असल्या कारणाने थंडीचा जोर वासरला होता. परंतु आता पुन्हा एकदा तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून समोर आली आहे.

राज्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा 19 अंश सेल्सिअस च्या खाली घसरला आहे. तर काही जिल्ह्यात 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर भारतात किमान तापमान घसरल्याने पुन्हा एकदा राज्यात कडाक्याची थंडी वाढणार आहे.

राज्यात थंडी पुन्हा वाढत असून धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान घसरल्याने थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिन्यात आली आहे.

मालदीव जवळील भागात चक्राकार थंड वारे वाहत असल्यामुळे राज्यातील किमान तापमानात हळू हळू घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

वार शुक्रवार (ता. 12) एकूण 24 तासात नोंदले गेलेले कमाल तापमान व किमान तापमान पुढील प्रमाणे आहे.

धुळे जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 31.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18.8 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील महाबळेश्वर थंड हवामानाच्या ठिकाणी कमाल तापमान 27.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.8 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

धुळे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. निफाड तालुक्यात कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19.1 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यात कमाल तापमान 30.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 16.1 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील छ.संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 16.5 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *