Viral farming:- अलर्ट 11 ते 14 फेब्रुवारी राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. दिनांक – 11 ते 14 फेब्रुवारी या चार दिवसात राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपीट होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी अंदाज वर्तवला आहे. कोण कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, हलका पाऊस होणार आहे खाली सविस्तर माहिती दिली आहे नक्की वाचा. (Havaman andaj 2024).
शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांची तूर, हरभरा व गहू काढणी सुरू झालेली आहे अश्या शेतकरी बांधवांनी 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान सतर्क राहावे असा इशारा डॉ. रामचंद्र साबळे (डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज) यांनी दिला आहे.
डॉ. रामचंद्र साबळे (Today havaman andaj) सांगतायत की राज्यातील काही विभागात जोरदार तर काही ठिकाणी मध्येम व हलक्या सरी कोसळणार आहे, विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे विदर्भातील गहू, तूर व हरभरा काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.
Today latest weather forecast:- सर्व प्रथम अवकाळी पाऊस हा विदर्भातील काही जिल्ह्यात धडकणार आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व काही भागातच जोरदार गारपीट होण्याची शक्यता डॉ. रामचंद्र साबळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. तसेच बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना देखील अवकाळी पाऊस पडणार आहे.
राज्यातील थंडी कमी झाली असून किमान तापमानात घट झाली आहे तसेच कमाल तापमान हे वाढले आहे त्यामुळे पावसासाठी राज्यात पोषक वातावरण 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दिसून येणार आहे.
डॉ. रामचंद्र साबळे सांगतायत की मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यात पासवसाच अंदाज आहे, त्यामध्ये हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव व छञपती संभाजीनगर या जिल्ह्यातील काहीच भागात हलक्या सरी कोसळणार आहे. मराठवाड्यातील कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हरभरा, तूर, गहू, कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये पण सतर्क राहावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, जळगाव, धुळे या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील व राज्यातील इतर भागात मात्र ढगाळ वातावरण (Cloudy weather) दिसून येणार आहे त्यामुळे द्राक्ष, कांदा, टरबूज व खरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क व्हावे.
शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचा हरभरा, गहू, तूर काढणी चालू आहे अश्या शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील नियोजन करावे डॉ. रामचंद्र साबळे…