दिनांक 19 व 20 जुलै कोकणात मुसळधार तर तुमच्या जिल्ह्यांना असा असेल पाऊस रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे हवामान अंदाज:- राज्यात पुढील संपूर्ण आठवडाभर पावसासाठी पोषक वातावरण राहणार असून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस संपूर्ण माहिती हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

आज आणि उदया असा असेल हवामान अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज:- राज्यात पुढील संपूर्ण आठवडाभर पावसासाठी पोषक वातावरण राहणार असून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस संपूर्ण माहिती हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

• सरासरीपेक्षा या जिल्ह्यांना पाऊस कमीच:-

खरीप हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजे जुन ते जुलै महिन्याच्या आज पर्यंत मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला आहे तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद समोर आली आहे.

• सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणारे जिल्हे:-

खरीप हंगाम सुरू झाल्यापासून जुन ते जुलै महिन्याच्या आज पर्यंत मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 94 टक्के अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे तर जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 62 ते 63 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

• आज आणि उद्या जिल्ह्यानुसार पावसाचा अंदाज कसा:-

• मराठवाडा:-

1- धाराशिव जिल्हा हवामान अंदाज 19 व 20 जुलै दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे.
2- परभणी जिल्हा हवामान अंदाज 19 व 20 जुलै दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे.
3- लातूर जिल्हा हवामान अंदाज 19 व 20 जुलै दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे.
4- नांदेड जिल्ह्यात मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
5- हिंगोली जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
6- जालना जिल्ह्यात मध्यम व हलका पाऊस होणार आहे.
7- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम व हलका पाऊस होणार आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार.
8- बीड जिल्ह्यात काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

• कोकण:-

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व मुंबई या जिल्ह्यांना आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. म्हणजे कोकणातील संपूर्ण जिल्ह्यात 19 व 20 जुलै मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणात होणार मुसळधार ते अती मुसळधार पाऊस डॉ रामचंद्र साबळे यांचा अंदाज.

• खानदेश:-

नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मध्यम व हलका पाऊस होणार असल्याची माहिती डॉ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकतो.

• विदर्भ:-

1- अकोला जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
2- अमरावती जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज डॉ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
3- गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
4- बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात हलका ते काही भागात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
5- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज डॉ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
6- नागपूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज डॉ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
7- यवतमाळ, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पहा धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *