दिनांक 26 व 27 फेब्रुवारी पूर्ण विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा पंजाबराव डख हवामान अंदाज

अलर्ट:- दिनांक 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज.

पूर्व विदर्भ हवामान अंदाज
अलर्ट:- दिनांक 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज.

Panjabrao dakh havaman andaj today:- राम राम शेतकरी मित्रांनो आज दिनांक/ 19 फेब्रुवारी रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे हा अंदाज पूर्व विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी आहे. दिनांक / 19 फेब्रुवारी आज पासून 25 फेब्रुवारी पर्यंत पूर्व विदर्भातील शेतकरी बांधवांनी गहू, हरभरा, तूर पिकाची काढणी करून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा कारण पुन्हा एकदा दिनांक / 26 फेब्रुवारी पासून पूर्व विदर्भातील काही भागात जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

पूर्व विदर्भात विजेंच्या कडकडासह अवकाळी पावसाचे संकट असून गहू, हरभरा, तूर काढणीस आलेल्या शेतकऱ्यांनी 26 फेब्रुवारी पर्यंत आपले पीक काढून घ्यावे असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

देशातील मध्ये प्रदेश, ऊत्तर प्रदेश व छतीसगड या राज्यांना गारपीट होणार असून याचाच परिणाम आपल्या पूर्व विदर्भात दिसून येण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

मध्ये प्रदेश राज्यातील जबलपूर या भागात जोरदार गारपीट होण्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.

दिनांक / 26 फेब्रुवारी रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, अचलपूर, अकोट, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, पुसद, हिंगोली, तसेच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यापर्यंत हा पाऊस मजल मारू शकतो. त्यामुळे वरील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी.

कारण पूर्व विदर्भात दिनांक / 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस होणार आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी हा अंदाज पाहून शेतीचे कामे उरकून घ्यावीत.
आज दिनांक/ 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी राज्यातील पूर्व विदर्भ सोडता इतर कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही त्यामुळे फक्त हा अंदाज पूर्व विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा अंदाज आहे. दिनांक / फेब्रुवारी नंतर उत्तर महाराष्ट्रात सुध्दा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. फक्त पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी आपला गहू, हरभरा, तूर 25 फेब्रुवारी पर्यंत काढून घ्यावा कारण 26 ते 27 फेब्रुवारी अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

दिनांक / 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे, अमरावती, अकोट, अचलपूर, यवतमाळ, पुसद, वाशिम, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात देखील थोड्या प्रमाणात पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे कमी उरकून घ्यावी धन्यवाद….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *