March weather alert दिनांक/ 17 फेब्रुवारी पासून राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे. दिनांक 29 फेब्रुवारी तर 04 मार्च दरम्यान पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज पंजाबराव दाख…
राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी दरम्यान काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, परंतु राज्यातील इतर भागात पावसाचा अंदाज नसल्याची माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (Panjabrao dakh havaman andaj).
दिनांक / 15 आणि 16 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील काही भाग, अकोला जिल्ह्यातील अकोट या भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम च्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस खूप मोठा नसेल त्यामुळे हरभरा व गहू उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
पंजाबराव डख यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा..
शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख यांनी काही दिवसंपूर्वी एक अंदाज वर्तवला होता त्यामध्ये त्यांनी दिनांक 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच जोरदार गारपीट होण्याचा इशारा गहू व हरभरा काढणीस आलेल्या शेतकऱ्यांना अगोदरच दिला होता. त्यामुळे त्यांचा या हवामान अंदाज मुळे विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान वाचले आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज जाहीर वाचा सविस्तर माहिती:-
राज्यातील हरभरा, गहू व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिनांक 17 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
राज्यातील तूर, गहू व हरभरा पीक काढणीस दिनांक 17 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपला गहू, हरभरा व तूर काढून घ्यावा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
दिनांक 16 व 17 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारी पासून 29 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असून हरभरा व गहू काढणीस योग्य आहे. शेतकऱ्यांनी दिनांक 29 फेब्रुवारी पर्यंत गहू, हरभरा व तूर काढून घ्यावा कारण दिनांक 29 फेब्रुवारी ते 04 मार्च दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
शेतकरी मित्रांनो 29 फेब्रुवारी पर्यंत शेतीचे कामे पूर्ण करून घ्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला की वेळेवर माहिती दिली जाईल धन्यवाद….