दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत वातावरण कोरडे

फेब्रुवारी महिन्यातील हवामान अंदाज पंजाबराव डख:-

पंजाब डख हवामान अंदाज
दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत वातावरण कोरडे

Latest February Month Weather Forecast:- शेतकरी मित्रांनो आज दिनांक 31 जानेवारी 2024 आत्ताची सर्वात मोठी बातमी, हवामान अभ्यासक पंजाबराव डख पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यातील एक महत्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. (Panjab dakh havaman andaj February).

राज्यातील हरभरा व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ज्या शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाची पेरणी ही लवकर केली होती त्या शेतकरी बांधवांचा हरभरा काढणीस आलेला आहे.

आज दिनांक 31 जानेवारी पासून तर 09 फेब्रुवारी पर्यंत वातावरण कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. त्यामुळे हरभरा व तूर काढणीस आलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

राज्यातील बहुतांश भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व विदर्भ या सर्व विभागात 09 फेब्रुवारी पर्यंत वातावरण हे दिवसा अंशत ढगाळ (Cloudy) असेल तर रात्री जोरदार थंडी (Night cold) जाणवेल असा इशारा पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

त्याचबरोबर दिनांक 10 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील बहुतांश भागात जास्त प्रमाणात ढगाळ (Cloudy) वातावरण तयार होऊन वेगाने वारे वाहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे जेवारी हे पीक जमिनीवर पडण्याची भीती 10 फेब्रुवारी नंतर अधिक आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी कलिंगड व खरबूज लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना 10 फेब्रुवारी नंतर चे वातावरण घातक ठरू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळीच व्यवस्थापन करावे असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

तसेच राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुध्दा 10 फेब्रुवारी नंतरचे वातावरण घातक ठरू शकते, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य वेळी फवारणी व्यवस्थापन करावे असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

राज्यातील अनेक भागात हरभरा व तूर पीक काढणीस आलेले आहे. त्यामुळे हरभरा व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्याच बरोबर 09 फेब्रुवारी पर्यंत रात्रीची थंडी चांगली जाणवेल असा ही अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *