देशातील वायदयामध्ये कापसाचे बाजार भाव वाढले राज्यातील शेतकऱ्यांना कापूस भाव वाढीची प्रतीक्षा…
शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून भाव वाढीच्या प्रतिक्षणे कापसाचा साठा मोठ्या प्रमाणात करून ठेवला आहे. परंतु सध्या कापसाला नीचांकी दर मिळत आहे, म्हणजे वल्या कापसाला 6000 ते 6500 रुपये तर चांगल्या कापसाला 7000 रुपये इतका कमी दर मिळत आहे.
यंदा शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस साठा केला परंतु उलट कापसाचे भाव दिवसेन दिवस कमी होताना बघायला मिळत आहे त्यामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
हंगामाच्या सुरवातीला कापसाला साधारण 8000 ते 8500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. हाच भाव लक्षात घेऊन पुढील काही दिवसात कापूस बाजार भाव 10 हजारा पर्यंत जातील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, कारण यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस कमी असल्यामुळे कापसाची लागवड कमी झाली तसेच पावसाने खंड दिल्यामुळे कापसाचे पीक जमिनीलगत राहून उत्पादन घटले. ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व या पावसात शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात भिजला आहे. या भिजलेल्या कापसाला फक्त 6500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही त्यामुळे देशातील शेतकरी सध्या खूपच अडचणीत सापडलेला आहे.
देशातील कापूस जवळपास 50 ते 60 टक्के विक्री झालेला आहे आणि उरलेला 40 टक्के कापूस आजुन शेतकऱ्यांनी कापूस भाव वाढीच्या प्रतीक्षणे साठा करून ठेवलेला आहे. त्यातच एक आनंदाची बातमी म्हणजे देशातील वायदयामध्ये कापसाचे बाजार भाव काही प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा लागली आहे.
परंतु तुमच्याकडे कापूस साठा भरपूर असेल तर कापूस हा टप्यात विकणे फायदेशीर ठरणार आहे असा सल्ला कापूस तज्ञांनी दिला आहे. पुढील काळात कापूस भाव वाढतील की नाही हे अवलंबून असते कापसाची आवक किती प्रेमानात होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी किती आहे यावर अवलंबून आहे.
राज्यातील कापूस बाजार भाव कधी वाढतील या बद्दल कापूस तज्ञ 100 टक्के पस्ट करत नाही त्यामुळे कापूस. कापूस मागणी इतर देशात कमी असल्यामुळे कापसाचे भाव कमी होत आहे परंतु पुन्हा एकदा देशातील वायदयामध्ये कापसाचे बाजार भाव हळू हळू वाढ वाढताने दिसत आहे धन्यवाद…