Namo Shetkari Yojana 4th Installment Namo Shetkari; नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार? पाहा…
व्हायरल फार्मिंग : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार राज्यातील 90 लाख शेतकरी आतुरतेने वाट पाहत असून, या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. कोणत्या महिन्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार? संपूर्ण माहिती या लेखात पाहा.
Namo Shetkari Yojana:- केंद्र सरकारने जसी पिएम किसान योजना देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभासाठी सुरू केली त्याचप्रमाणे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. पिएम किसान योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये दिले जातात. त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजनेद्वारे राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना 6000 रुपये वर्षाला दिले जातात. म्हणजे प्रत्येकी चार महिन्याला पिएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात.
मित्रांनो आजपर्यंत पिएम किसान योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांचा खात्यात पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता गेल्या महिन्यातच जमा झाला असून नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता मात्र शेतकऱ्यांचा खात्यात अजून जमा झालेला नाही. त्यामुळे चौथ्या हप्त्याची वाट राज्यातील शेतकरी आतुरतेने पाहत आहे. कारण अल्प भूधारक शेतकऱ्यांचा फवारणीचा वाढत असलेला खर्च त्यांना भागवणे कठीण झाले आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा शेती खर्चासाठी मिळणार आहे. त्यामुळे गरजवंत आणि अल्प भूधारक शेतकरी नमो शेतकरी चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच उत्पादन सुरक्षित करण्यासाठी लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकार या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये आर्थिक सहाय्य प्रतिकी चार महिन्याला देते. वर्षाला एकूण या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळतात. पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला असून चौथ्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे.
पिएम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र असेल तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे, कारण पिएम किसान योजनेचा डाटा राज्य सरकार घेऊन नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांचा थेट बँक जमा केले जातात. जर तुम्ही आजूनही या योजनेसाठी पात्र नसाल तर फॉर्म भरणे सुरू असून ऑनलाईन किंव्हा ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या दिवसापासून तुम्हाला हप्ता देण्यासाठी ग्रहीत धरले जाणार आहे. त्यामुळे या अगोदरचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही.
• नमो शेतकरी योजना नेमकी काय आहे?
राज्य सरकारने सुरू केलेली योजना नमो शेतकरी मित्रांनो ही राज्यातील अल्प भूधारक आणि गोर गरीब शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी आर्थिक सहाय्य मिळावे त्यामुळे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. आत्ता पर्यंत महाराष्ट्र सरकारने या योजनेचे तीन हप्ते वितरित केले असून आता चौथ्या हप्त्याच्या उंबरठ्यावर ही योजने येऊन पोहचली आहे. पिएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. पिएम आणि नमो या दोन्ही योजनेद्वारे अल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये दिले जात असून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत होत आहे.
• नमो शेतकरी चौथा हप्ता कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित होण्याअगोदर तुमचे बँक आधार लिंक आहे की नाही हे चेक करून घेणे गरजेचे आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला आहे अश्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता 100 टक्के मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार या बद्दल आजूनही कुढलीही तारीख फिक्स झालेली नाही परंतु लाडकी बहीण योजनेचा पहिली हप्ता 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान राज्यातील महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशी माहिती सध्या सोशल मीडिया वर पसरत आहे किंव्हा विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती जाणकारांच्या माध्यमातून मिळत आहे.
सूचना : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आजुन तारीख ठरलेली नसून, विधानसभा निवडणुका आचारसंहिता लागण्यापूर्वी किंव्हा ऑगस्ट च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती मिळत आहे धन्यवाद..